(प्रतिनिधी स्नेहा जावळे) नायगाव मधल्या एका परिचिताचे काल कार्डीनल हाॅस्पिटलला ओप्रशन झाले होते त्यांना आज रक्ताची आवश्यक्ता होती . त्या परिचितांच्या पत्नीने फोनवर तशी माहीती दिली आणि इथल्या मित्रपरिवाराची रक्ताची जमवाजमव कराला धावपळ सुरु झाली, हे मा. धरेंद्रजीना कळले आणि त्यानी सांगितले मी बघतो कुठुन रक्तपुरवठा मिळतोय का , पण वेळ कमी हेता आणि वेळेचे महत्व लक्षात घेवुन त्यानी स्वत: जावुन रक्त दान केले .
आता जिथे लोक बाहेर पडायला घाबरतात , तिथे स्वत: जावुन धरेद्र कुलकर्णीजीनी रक्तदान केले . संचारबंदी / जमावबंदी व धारा १४४ लागु आहे म्हणुन मी एकटा जातो असे सांगुन ते रक्तदान करुनच आले .
याच घटनेला लक्षात ठेवुन हे आवर्जुन सांगावे वाटते की त्यांच्या श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्टनी , ट्राॅमा हासेपिटलच्या सांगण्यावरुन व आमदार मा.हितेंद्र ठाकुरजीच्या मार्गदशनातुन , सभापती मा. कन्हैया भोईरजीच्या सह्योगातुन दि ३० मार्च व दि. ३१ मार्च ला रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे . येणाऱ्या काळात रक्तसाठा कमी पडु शकेल ही काळाची गरज ओळखुन ह्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
मा. धरेंद्र कुलकर्णीजी तुमच्या संकटकाळीतील या सेवाभावी वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *