
देशात कोरोना या आजारामुळे संचार बंदी कायदा लागू करण्यात आलेला असल्याने कोणत्याही व्यक्तीला घराबाहेर निघण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. महाराष्टामध्ये दररोज काम करून पोट भरणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.येथील नागरिक उपाशी मरू नये याची दक्षता घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.प्रशासनामार्फत आदिवासी/गरीब/गरजू लोकांना अन्न पुरवठा अथवा रेशनिंग वस्तूचे वाटप होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये तलाठी व मंडळ अधिकारी यांची एक कमिटी बनविण्यात यावी प्रत्येक गावातील लोकांची माहिती संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांना असते त्यामुळे प्रशासनामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधा गरीब/आदिवासी/मजदूर व गरजू लोकांपर्यंत पोहोचविणे सोपे होईल. तसेच प्रत्येक गावातील अथवा शहरातील एकही नागरीक उपाशी राहून त्याच्यावर मरणाची वेळ येऊ नये याची दक्षता घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मजदूर/आदिवासी/गरीब व गरजू लोकांना अन्न पुरवठा अथवा रेशनिंग वस्तूचे वाटप करण्याची मागणी बहुजन महापार्टी तर्फे करण्यात आलेली आहे तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी तात्काळ संबंधित अधिकारी यांना योग्य ते आदेश व निर्देश पारित करावे अशी विनंती करण्यात आली आहे.याअगोदर देखील प्रशासनामार्फत मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती.मा.जिल्हाधिकारी धुळे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना दिनांक 20/03/2020 रोजी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले होते व मा.जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दिनांक 24/03/2020 रोजी राज्य शासनाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल असे कळविले आहे तर जिल्हाधिकारी ठाणे यांनी ठाणे क्षेत्रात मास्क व सॅनिटायझर वाटप कार्य सुरु असल्याबाबत कळविलेले आहे असे बहुजन महापार्टीचे महासचिव शमसुद्दीन खान यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.