
(वार्ताहर आकेश मोहिते)कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे त्यांस आळा घालण्याच्या हित दृष्टीने सरकार योग्य ते निर्णय देत असताना सर्वत्र नागरिकांच्या मूलभूत जीवनावश्यक गरजा निदर्शनास आणून मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांची संचारबंदी भारतात लागू केलेली आहे. या पार्श्वभूमीवर इतर सेवांपैकी गॅस घरपोच सेवा ही केंद्र सरकारने लागू केलेली असताना देखील वसई-विरार येथील गॅस वितरक मात्र नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडर घरपोच सेवा करण्याचे नाकारत आहेत. याबद्दल पालघर जिल्हा अध्यक्ष गिरीश अरविंद दिवाणजी यांनी जिल्हा अधिकारी पालघर तथा आयुक्त यांना लिखित पत्राद्वारे तक्रार नोंदवली आहे. तरी अशा अवघड प्रकारामुळे सामान्य जनतेची वितरणांच्या गोदामांवर गर्दी दिसून येत असताना अशा परिस्थितीत नाईलाजाने पोलिसांना गर्दी सांभाळण्यासाठी नागरिकांवर कारवाई करण्याचे कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत कोरोनाच्या पार्श्व भूमीवर प्रचंड प्रमाणात होणारी गर्दी टाळण्याकरिता हीच बाब विचारात घेऊन गॅस वितरण व्यवस्थेतील दोष दूर करावेत तथा संबंधित गॅस वितरकांकडून नागरिकांना घरगुती सिलेंडर घरपोच सेवा तात्काळ अर्थात लवकरात लवकर मिळावी असे पालघर जिल्हा अध्यक्ष मा. गिरीश दिवाणजी यांची मागणी आहे. जेणेकरून भविष्यातील हा संसर्गाचा रोग आटोक्यात आणण्यास मदत होईल.
