लोकप्रतिनिधी बेजबाबदार वागू लागतात तेव्हा जागृत नागरिकांना स्वरक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागते. कोळीवाडा, हाथीमोहल्ला, मुसाजी गल्लीपासून पार पाचुबंदरपर्यंतचा भाग आज जिवंत बॉम्ब बनला असताना इथल्या लोकप्रतिनिधींकडून इथे समाज प्रबोधनाची गरज होती. वेळप्रसंगी शिस्तही आवश्यक आहे.

पण या भागाचे दुर्दैव हे की; हा भाग बेवारस आहे. इथल्या दुकानदारांना आणि काही गुढघ्यात अक्कल असलेल्या नागरिकांना थोड़ा दम देण्याची गरज होती. पण हे काम लोकप्रतिनिधी अथवा स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत नसल्याने संचार बंदी रस्त्यावर आली आहे.

वेळचा कालावधी ओलांडून दुकाने उघड़ी राहत असल्याने अहोरात्र गर्दी होत आहे. मात्र या बेशिस्त दुकानदारांवर कारवाई व्हावी किंवा केली जावी यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. *इथल्या लोकप्रतिनिधींच्या कार्यालयासमोरच बिनदिक्कत कायदयाचे उल्लंघन व वेळेची मर्यादा ओलांडून दुकाने उघड़ी ठेवली जात आहे. या दुकानांसमोर प्रचंड गर्दी होत असल्याने अन्य लोकांचा जीव धोक्यात आला आहे.*

*इतकी भयाण अवस्था असताना टांगा पलटी; नगरसेवक व स्वंयघोषित सामाजिक कार्यकर्ते फरार
असल्याने आता स्वरक्षणासाठी व गर्दी पांगवण्यासाठी नागरिकांनाच रस्त्यावर उतरवावे लागत आहे
…………………………………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *