

वसई विरार महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिका-यांच्या हलगर्जीपणा मुळे महापालिका क्षेत्रात वाढु शकतात कोरोना विषाणू चे रुग्ण संपूर्ण जगात अक्षरशः थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने आतापर्यंत हजारो बळी घेतलेले आहेत आपल्या भारतात सुध्दा कोरोनाचे अनेक रुग्ण आढळले असून महाराष्ट्रातील त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे कोरोनाशी लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 21 दिवसांचा लाॅक डाउन जाहीर केलेला असुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी जनतेला.घराबाहेर जाऊ नका गर्दी करूनका मास्क तोंडावर बांधा सॅनेटायझर ने हात स्वच्छ ठेवा असे आवाहन केले असून महाराष्ट्रातील जिल्हाधिकारीना जिल्ह्यात जंतूनाशकाची फवारणी करण्याचें आदेश दिलेले आहेत संपूर्ण जग कोरोना ह्या विषाणू मुळे भयभीत झालेले असतांना वसई विरार महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्षातील आचोले ड प्रभागातील नेमलेले अधिकारी व सह आयुक्त कोरोना विषाणूस हलक्यात घेत असल्याचे दिसून येत आहे महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून जंतू नाशक फवारणी करणे गरजेचे असतानाही जाणीव पुर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आर.पी.आय.(ए) चे पालघर जि (उपाध्यक्ष) नितीन पाटील यांनी केला आहे नितीन पाटील राहत असलेल्या श्री जिवदानी कृपा अपार्टमेंट ह्या सोसायटीत दोन दिवसां पुर्वी एक इसम दुबई वरुन नातेवाईकांकडे राहावयास आला त्यास वारंवार खोकला येत होता तसेच त्यास उलट्या हि होत होत्या त्या मुळे सोसायटीच्या चेअरमन नी त्या इसमाच्या नातेवाईकांना विचारणा केली व डाॅ.अथवा पोलीसांना कळवावयास सांगितले असे सागताच थोड्या वेळाने तो इसम नातेवाईकांन कडुन निघून पळुन गेला त्या मुळे सोसायटीतील रहिवासी भयभीत झाले सोसायटी चे चेअरमन व नितीन पाटील यांनी तातडीने महापालिकेच्या ड प्रभागाच्या सह आयुक्त मनाली शिंदे व आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिकाऱ्यांना तसेच स्थानिक नगरसेवक वैभव पाटील याना घडल्या प्रकाराची माहिती दिली व जंतू नाशक फवारणी करण्याची विनंती केली मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व नगर सेवकांनी दुर्लक्ष केले वारंवार फोन करूनहि फवारणी अथवा साधी चौकशी करावयास कोणीहि आले नाही यावरून कोरोना सारख्या भयानक विषाणू चा संसर्ग रोखण्यासाठी वसई विरार महापालिका किती जागरूक आहे हे दिसून येत आहे.