

वसई :- आशिया खंडातील सर्वात मोठा देश चीन यामधून कोरोना ह्या महामारी आजरा मुळे संपूर्ण जगाला हादरून देणारा हा व्हायरस ज्यावर कोणतेही औषध आजच्या तारखेत सापडले नाही असा दावा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने केला असला तरी जगातला प्रत्येक देश या कोरोनाशी लढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने झुंज देत आहे.जगातला आर्थिक परीने मोठा असलेला देश अमेरिकेला सुध्दा या व्हायरस ने पाठिमागे टाकले. या व्हायरस ने आज गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगावर आपली छाप टाकली आहे,कोरोना व्हायरस फक्त माणसामध्येच पसरते हा व्हायरस प्राण्यांमध्ये पसरत नाही.प्रत्येक देश व त्या देशातील माणस हे या कोरोना व्हायरस पासून दररोज आपला जीव मुठीत घेऊन लढत आहेत.वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने या व्हायरसवर अभ्यास करून जे रिपोर्ट लोकांसमोर मांडले त्यात एवढेच स्पष्ट होऊन आले आहे की जर कोणी कोरोना व्हायरस बाधित असेल तर त्याला कोणते प्रिकोशन्स लोकांनी घ्यावे हे सांगितले आहे ते असे की 1) आपल्या मध्ये सोशल डिस्टन्स म्हणजे कमीत कमी 1मीटर व त्या पेक्षा लांबी दोन माणसामध्ये ठेवावी. 2) प्रत्येक माणसांनी आपले हात दर 20 मिनिटांनी साबण किंवा सॅनिटायजर ने धुवावे 3) खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल किंवा टिश्यूचा वापर करावा. 4) बाहेर जाताना आपल्या तोंडावर मास्क घालावे व हातात ग्लोज ही वापरावे असे आव्हान केले. भारतात ही या व्हायरस कोरोना ने आपली भीती निर्माण केली आहे. म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण 21 दिवसाचा लॉक डाउन बजावला ज्यामुळे या व्हायरस वर नियंत्रण आणण्यास मदत होईल.या महामारी मुळे देशाचा प्रत्येक नागरिकाने मोदींचे समर्थन आपली जिवंनचर्येला बळी पडून दिली आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्हातील जनताही त्रस्त आहे. या परिस्थितीची जाणीव ठेवून वसई तालुक्यातील प्रशासनासह विविध संस्था तसेच पत्रकार संघांनी पुढाकार घेऊन त्रस्त जनतेची मदत करण्यासाठी वेगवेगळी मोहीम राबिवली आहे.शासनासह पोलीस प्रशासन,आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून स्वतःला मोहिमेत झोकून दिले आहे. आमच्या युवाशक्ती एक्सप्रेसच्या कार्यकारी संपादक रुबिना मुल्ला, पत्रकार एस.रहमान शेख, व वार्ताहार आणि जाहिरात प्रतिनिधी तहेसीन चिंचोळकर तसेच भारत न्युज 24 चे पत्रकार कासीम खान व पत्रकार समाजसेविका शीतल चौहान यांनी या मोहिमेत आवर्जून भाग घेतला व गरजू साठी औषधी पुरवठा अन्नधान्य पुरवठा व आपत्कालीन व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या.अशा मोहिमेद्वारे या कार्यकर्त्यांनी देशाच्या जनतेनेही सहकार्य करावे व आपल्या घरातच राहून या कार्यकर्त्याचे उत्साह वाढवावे

