
अशा वेळी खऱ्या अर्थाने गरज वाटते ती…. असगर अली इंजीनियर यांच्यासारख्या शांतता, जातीय ऐक्य आणि धर्मनिरपेक्षता पुन्हा एकदा समजावून सांगतील, अशा सुधारणावादी व्यक्तिमत्त्वांची!
‘लिव्हिंग फेथ’ हे त्यांचे पुस्तक शांती, सलोखा आणि सामाजिक परिवर्तन यांची शोधयात्रा आहे. यातून त्यांचे जीवन आणि संघर्ष उलगड़तो.
अत्यंत साधेपणाने केलेल हे लिखाण एक प्रकारे असगर अली इंजीनियर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे निदर्शकच आहे. त्यांच्या आयुष्याला आणि त्या दृष्टिकोणाला ज्या व्यक्तिगत, सामाजिक आणि राजकीय घटनांनी आकार दिला त्या घटना, सनातनी बोहरा धर्मगुरुंविरोधात त्यांचा झालेला संघर्ष आणि एक सामाजिक व धार्मिक सुधारणा करणारा नेता म्हणून त्यांचा झालेला उदय याचा हा कालक्रमवार वृत्तांत आहे. सर्व धर्मश्रद्धाना कवेत घेणारा समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना सर्व जगातील विविधरंगी, धार्मिक तसेच राजकीय नेत्यांशी त्यांचा जो परस्पर संबंध आला त्याचे हे चित्रण आहे.