

वसई : वसई-कोळीवाडा प्रभाग-113 येथील रहमतुल्लाह इमारतीसभोवती मागील काही महिने प्रचंड कचरा सचला असल्याने या इमारतील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वसई-विरार महापालिकेला याबाबत तक्रारी करूनही कोणतीही पावले उचलली जात नसल्याने रहिवाशांच्या चिंतेत अधिकच भर पड़ली आहे.
तर परिसरातील नगरसेवकही उपलब्ध नसल्याने आता प्रश्न मांडायचा कुणाकड़े असा प्रश्न या इमारतीतील रहिवशांनी केला आहे.
रहमतुल्लाह ही इमारत अनधिकृत असून; ती आसिफ काझी या बांधकाम व्यावसायिकाने बांधली आहे. इमारत अनधिकृत असल्याने महापालिकेने बांधकाम व्यावसायिकाला नोटिसही बजावली होती. मात्र आता ही इमारत कचरा आणि परिसरातील दुर्गंधीला तोंड देत आहे.
किमान कोरोनाचे संकट बघता तरी पालिकेने या भागाची स्वच्छ्ता करावी, अशी विनंती या इमारतीतील नागरिक करताना दिसत आहेत.