आज पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दादासाहेब भुसे यांची जिह्याचे जिल्ह्याधिकारी, प्रांत, तहसीलदार, महापौर यांच्या सोबत वाढत्या कोरोना प्रादुर्भावा संबंधित आढावा घेण्यासाठी एक बैठक आज तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत पालकमंत्री यांनी सर्व संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना सरकार मार्फत पुरवले जाणारे धान्य तसेच अनेक नागरिक ज्यांना या परिस्थितीमुळे अन्न मिळणे मुस्किल झाले आहे अशा हजारो लोकांना त्वरित अन्न पुरवण्याची सोय करण्याचे आदेश दिले त्याचप्रमाणे वैद्यकीय सुविधासंदर्भात काही निर्देश दिले आहेत, सदर बैठकीला *सन्मानीय खासदार श्री राजेंद्र गावित, शिवसेना पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार श्री रवींद्र फाटक साहेब* उपस्थती होते.
त्यापूर्वी सन्माननिय पालकमंत्र्यांनी शिवसेनेच्या काही निवडक पदाधिकाऱ्यांची वसई शिवालय येथे भेट घेतली ज्या भेटीत पदाधिकाऱ्यांनी काही सूचना तर काही तक्रारी सन्माननीय पालकमंत्री यांच्याकडे मांडल्या.
यावेळी महानगरपालिकेच्या आरोग्यसुविधा,स्वछता,तसेच रेशनधान्य वितरणातील त्रुटी पदाधिकारी यांनी त्यांच्यासमोर मांडल्या.त्याच बरोबर राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार सुरू करण्यात येणारे अन्नछत्र नवघर माणिकपूर परिसरात पूर्व – पश्चिम दोन्हीकडे सुरू करण्यात यावे ही आग्रही मागणी गटनेत्या सौ किरण चेंदवणकर यांनी लेखी निवेदनाद्वारे दिली, तसेच उप जिल्हा प्रमुख निलेश तेंडोलकर, पंचायत समिती सभापती अनुजा पाटील, प्रविण म्हाप्रळकर, विवेक पाटील, मिलिंद खानोलकर, चिन्मय गवाणकर व अनेकशिवसेना पदाधिकारी यांनी काही सूचना पालकमंत्री यांना केल्या. याशिवाय नवघर येथील शिधा कार्ड नसलेल्या तसेच रोजंदारी करणाऱ्या नागरिकांची यादी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *