

वसई विरार महानगरपालिका
प्रभाग समिती ई नालासोपारा
आरोग्य विभाग
सध्या तालुका करोना व्हायरस रुग्ण
वसई तील ग्रामीण भागात दिसून येवू
लागलेत नुकताच राजोडी ह्या महानगरपालिका हद्दीत होते हा विभाग नाळा राजोडी असून वाॅर्ड क्र पस्तीस मधील आहे .
महानगरपालिका अनेक विकास कामे करते .नेमका विकास कामे जनतेकरीता की ठेकेदारासाठी हा प्रश्न नेहमी मनाला सतावतो असतो.
स्थानिक नगरसेवक नेहमी विकासकामांची माहिती (प्रसिद्ध साठी)देत असतात.
अनेक पाईप गटार (बंदिस्त) बांधकामे झाली (शेतीवाडीतीलही गरज नसतानाही) रहिवासी विभाग व मुख्य रस्त्यालगतचीही परंतु नऊ वर्षापासून बांधलेली बंदिस्त गटारातील गाळ आजपर्यंत सफाई ठेकेदारांनी न काढल्यामुळे गटारातून पावसाळी पाण्याच्या निचराच होत नाही फक्त सांडपाण्याच्या स्टोअरेच ट्यॅकं झालेला आहे डासांच मालकीच घर आहे झाकंण उघडून औषध फवारणी ही होत नाही.
हीच परिस्थिती वाॅर्ड क्र.56 व वाॅर्ड क्रं 94 ची आहे.
येथील आरोग्य ठेकेदार साई गणेश एंटरप्रायझेस (हिम्मत कुमार यादव) ह्या व्यक्तीने पाच वर्षापासून ठेका घेतलेला आहे तब्बल महानगरपालिका ह्याला जनतेचे पस्तीस लाख रुपये दर महीना देते परंतू जनतेला ही व्यक्ती दिसत नाही व कोणी नागरिकांनी पाहील असे वाटत नाही जनतेच्या सोयीसाठी स्थानिक नगरसेवक समाजसेवे साठी आरोग्य कर्मचारी (स्वच्छता दुत) यांचं नियोजन करताना मतदारांना जनतेला दिसतो परंतु प्रसिद्ध पासून अलिप्त असतात ह्या भुईगाव निर्मळ वाघोली नवाळे मर्देस या विभागातील कोणतीही बंदिस्त गटाराची पाहणी केल्यास संर्पुण गाळाने भरलेली दिसतील औषध फवारणी ही नाही व गाळ उपसाही नाही पण दोन महीन्यानी मुख्य रस्त्यावरील उघडे गटारातील गाळ उपसा करुन आठवडा भर नेत्यांना दिसण्याकरीता नक्कीच ठेवणार!
ठेकेदाराला एक वर्षाच्या ठेका असताना सतत आपोआप महानगरपालिका रिनीव्ह करतो नगरसेवक स्वच्छतेच नियोजन करताना दिसतात.
सदर ठेक्यात नगसेवकाची भागीदारी आहे ? असो स्थानिक जनतेची भरभरून विकास कामे करणारे नगरसेवकाचाही विकास का होऊ नये?
वसई विरार महानगरपालिका हद्दीत आम्ही रस्त्यावरून नेहमी प्रवास करताना पाहीलं आहे कुठेही रस्त्याच्या कडेला कचराकुंडी व कचरापेट्या नाहीत फुटपाथ वरून चालताना ही कुठे दिसल्या नाहीत
या बाबत सहज तात्कालिन शहर अभियंता मा.माधव जवादे तसेच आरोग्य अधिकारी यांच्या शी चर्चा झाली त्यांनी सांगितले आम्ही कचरापेट्या तसेच कचराकुंडी मुक्त वसई धोरण राबविले आहे तसेच फक्त नोंदणी कृत सोसायटी यांना त्यांच्या सोसायटीच्या आवारात सुका व ओला कचरा जमा करण्यासाठी कचरापेट्या महानगरपालिकेतर्फे दिलेल्या आहेत
मग आमच्या ग्रामीण भागातील नियोजन कसं त्या करीता वेगळं टेंडर असतं घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे तसेच औषध फवारणी व रस्ताची सफाई ही दररोज न चुकता
मग आमच्या कडे ठेकेदाराने कचरापेट्या मुख्य रस्त्यावर ठेवलेल्या आहेत त्याबाबत काय ? त्या चुकीच्या आहेत आम्ही उचलून घेतो अस आम्हाला उत्तर दिल.
(नाळा, वाघोली, निर्मळ मार्गे भुईगाव हा मुख्य रस्ता असुन अरूंद आहे सकाळ व संध्याकाळी वाहानाने गजबजलेला आहे त्यातच तीन प्राथमीक व माध्यमिक शाळा व त्यातील तीस टक्के विद्यार्थ्यी सायकल प्रवास करतात शाळकरी विद्यार्थीच्या बसेस मोठ्या येतात अरूंद रस्त्यावर कचरापेट्या व त्याबाहेरील साचलेला कचरा मुळे वाहतुकीस वाहनाना तसेच शालेय पायी जाणारे व सायकल विद्यार्थाना धोकादायक प्रवास आम्ही प्रत्यक्ष पाहीला आहे. त्यातच दोन्ही बाजुची उघडी गटार ह्या कारणास्तव कचरापेट्या उचलाव्यत)
(पर्याय म्हणून मुख्य रस्त्यावरील गटारावर स्लॅब टाकाव व बंदिस्त करावेत असही पत्र दिलं परंतू ते गटार पी डब्ल्यू डी चं अस उत्तर मिळाल परंतू जिथे घाण जास्त प्रमाणात साचते तीथे सोयीस्करपणे महानगरपालिका स्लॅब टाकते ,ठेकेदाराच्या सोयीकरीता? उदा. निर्मळ रागी हार्डवेअर मटन शाॅप, बोडन नाका नाळा मटन शाॅप )
त्यांनी लगेच आमच्या समक्ष आरोग्य अधिकारी सिताराम तारमाळे ह्यांना फोन केला त्यानंतर आम्हाला तारमाळे ह्यांनी वरीष्ठ अधिकारी व प्रभाग समिती ई सहाय्यक आयुक्त ह्याच्या नावाने लेखी पत्र देण्यास सांगितले
लेखी पत्र व्यवहार झाला चौकशी सुरु झाली पत्र देवून सहा सात महिने झाले सहाय्यक आयुक्त शेळके, गिल्सन गोन्सालविस, प्रविण पाटील, संतोष मुने,अधिकारी परदेशी,भगत,मुकणे,तारमाळे परंतू आजही वरील वाॅर्ड क्रं 94व वाॅर्ड क्रं 56 मधील एकही कचरा डब्बा (महानगरपालिकेची कचरापेटी) उचलून नेलेली नाही .
(निर्मळ दोडती आळी ते मांडळई आळी वाघोली अंतर सहाशे मिटर कचरापेट्या एकूण तीस हा मुख्य रस्ता आहे)
ठेकेदार हिम्मत कुमार यादव ह्यांची ऐवढी हिम्मत कुठून आली शहर अभियंता पासून आरोग्य अधिकारी एकही अधिकारी कर्मचारी स्वतःचा अधिकार व नियम वापरू शकला नाही?
वसई विरार महानगरपालिका हद्दीत फक्त ह्या दोन्ही वाॅर्ड मध्ये च कचरापेट्या का अन्य ग्रामीण विभाग व शहरी विभागत का नाही
ह्या ठेकेदार फक्त कागदावर असेल ?
खरोखरच नगरसेवकांनी च ठेका घेतला आहे? ह्या ठेकेदाराला मुदतवाढ का?
वरीष्ठ अधिकारी प्रत्यक्ष स्वच्छतेची पाहणी करीतील?
सध्या आरोग्य चा प्रश्न गंभीर आहे
नाळा 2,वाघोली2,मर्देस 1 निर्मळ5,भुईगाव2 ह्या दोन्ही वाॅर्ड तएकूण 12 डाॅक्टर डिस्पेन्सरीतुन 450 हून अधिक दररोज आजारी ग्रामीण जनतेची सेवा करीत आहेत ह्याहून महानगरपालिकेचा औषधोपचार नाही परंतू सच्छतेची तरी हमी घेणार का? विशेष म्हणजे अपुरे कर्मचारी वर्ग वापरून कचरापेट्या माध्यमातून कधीतरी कचरा उचलून आपला विकास जनतेच्या भरमसाठ घरपट्टी ती ही शास्ती आकारून लुटमार करणारी महानगरपालिका व त्याबाबत एकही शब्द न उच्चारता गप्प बसणारे नगरसेवक ठेक्याच्या माध्यमातून ठेकेदाराचा मानसम्मान करतात ?जाब का विचारत नाही? गटार बांधकाम, पेव्हर रस्ता व स्ट्रीट लाईटची विकास काम दाखवत आरोग्य बाबत गप्प का?अनेक नगरसेवक लोकनेते होवू पाहत आहेत.
वरील सच्छतेचा ठेका व कर्मचाराचं नियोजन सकाळी व दुपारी दोन्ही वेळेस निर्मळ होलीक्राॅस चर्च समोरून पाहता येईल परंतू साई गणेश एंटरप्रायझेस चे ठेकेदार हिम्मत कुमार यादव कधीच दिसणार नाही व त्यांना जाब विचारण्यासाठी आरोग्य अधिकारी व नगरसेवक जबाबदारी घेईल ह्याची शक्यता नाही .
सभापती, महापौर, लोकनेते ह्यांना विनंती ठेक्याचा व ठेकेदाराचा विकास करणारा करणारा नगरसेवक नको आरोग्य सुविधा बाबत जनतेला दिलासा व आश्वासित करा.