

वसई, प्रतिनधी : वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासन एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत असताना मनपातील काही कंत्राटी अधिकारी ही आपल्या कर्मचाऱ्या बरोबर आपल्या पदाचा दुरुपयोग करून कामगारांच्या जिवावर बेतण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहेत. कोरोना व्हायरस महामारी मुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींने जे 21 दिवसाचे लोकडाऊन संपूर्ण देशासाठी बजावले असतानाच काही राज्यात जिल्ह्यात व शहरात या लोकडोउनचे उल्लंघन ही करणारे काही पालिकाप्रशासन अधिकारी वर्गाकडुन होत आहे.हे अधीकारीगण पालिका कामगारांवर आपल्या पदाचा दबाव टाकून लॉकडाउनच्या पालनचे उल्लंघन मोडत कामगारांना पालिकेच्या ऑफिसमध्ये ड्युटीवर हजर राहून काम त्यांना करण्यास सांगत अशी प्रतिक्रिया आमच्या युवाशक्ती एक्सप्रेसच्या कार्यकारी संपादिका रुबिना मुल्ला यांच्या कडे व्यक्त केली आहे.पालिका भूमिका बजावणाऱ्या वर्गात लिपिक कामगार इत्यादी सह महिला कामगारांचेही समावेश आहे त्यात काही गरोदर व नुकतीच प्रस्तुतीतुन झालेल्या महिलांचे ज्या आरोग्याच्या दृष्टीने पालिकेच्या ड्युटीवर हजर राहण्यास समर्थ नसतानाही हे कर्मचारी अधिकारी वर्ग आपल्या पदाचा गैरफायदा दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.संपूर्ण वसई तालुका हे जरी कोरोना ग्रस्त लॉकडाउनचे बंद पाळत असले तरी या कामगारांना ना इलाजाने अधिकाऱ्याच्या आदेशानुसार चालावे लागत आहे. पालिका हद्दीत काम करणाऱ्या महिलांपैकी काही महिला आहेत.त्यांच्या गरोदर व प्रस्तुती काळा दरम्यान ज्या महिला स्वतःच्या आरोग्याच्या दृष्टीने शारीरीकपणे कोरानासारख्या कोणत्याही रोगाशी लढा देण्यास असमर्थ असतात अशा महिलांना व त्यांच्या लहान मुलांना देखील हा रोग होऊ शकतो. गरोदरपणाच्या परिस्थितीत आरोग्याच्या दृष्टीने आपली व आपल्या लहान मुलांची काळजी घेण्यासाठी अशा महिलासाठी भारतीय कायदा कलमान्वये हक्क देखील बजावण्यात आले आहे. तरी या महिलांना अशा वेळेत कामावर हजर राहावे लागत आहे.कोरोना महामारी रोगापासून शासनाकडून कुठलेच आरोग्य नियोजन न मिळाल्याने जर हे कामगार ह्या रोगांना सामोरे गेले तर याचे जबाबदार कोण ? जर त्यांना आरोग्याच्या विविध मूलभूत सुविधा मिळाल्या तर त्यांच्यापर्यंत कितपत पोहोचल्या आहेत ? हे ही आजच्या परिस्थितीतून दिसून येते, शासनाने प्रत्येक पालिका कर्मचार्यकडे लक्ष दिले पाहिजे मात्र ते स्त्री असो व पुरुष, एकीकडे वसई विरार शहर मनपा वसई तालुक्यातील नागरिकांत कोरोना सारख्या महामारीशी लढण्यासाठी विविध योजना संदर्भात विशेष लक्ष केंद्रित करून नागरिकांपर्यंत त्यांच्यासाठी मूलभूत गरजा पुरवण्याची भूमिका बजावताना दिसत आहे.तर दुसरीकडे पालिका प्रशासन अधिकारी अशा कामगारांवर आपल्या पदाचा गैर वापर करत आहे. अशा अधिकाऱ्यांच्या या गैरवर्तूनीवर प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे यावर कार्यवाही व्हावी अशी प्रतिक्रिया दिसत आहे.