(नालासोपारा: एस.रहमान शेख) आज संपूर्ण देशावर कोरोनासारख्या महामारीचे संकट असताना देखील काही विविध धर्माचे संभ्रमित नागरिक या संकटाला मात देण्यासाठी शासनाचे उल्लंनघन करण्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.अशा परिस्थितीवर नागरिकांना समजूत घालून काही स्थानिक समाजसेवकांनी पुढाकार घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेचा भार उचलला आहे. सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी आहे की, वसई तालुक्यातील नालासोपारा येथील रहमत नगर परिसरात संशयीत एक कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तेथील स्थानिक नागरिकांनी माहिती महापालिका प्रशासन ला दिली असता त्या विभागात सर्वे करण्यात आले आहे, रहमत नगर हा बहुल मुस्लिम परिसरने ओळखला जातो, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या परिसरात सर्वे करत असता तेथील नागरिकांनी NRC/CAA चा संदर्भात सर्वे आहे असे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे तेथील नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने ही बाब लक्षात घेऊन तेथील स्थानिक समाजसेवक यांनी भ्रमणध्वनी द्वारे महापालिकाच्या प्रशासनशी संपर्क साधला असता तेथील सह-आयुक्त श्री विजय चव्हाण यांनी भेट दिली.महापालिके तर्फे आरोग्याच्या दृष्टीने हे सर्वे करण्यात येत असून.आपण सर्वांनी महापालिकेला सहकार्य करावे ही विनंती त्यांनी समाजसेवकच्या माध्यमातून नागरिकांना पटवून सांगितले. घरात रहावे स्वछता बाळगावी व आपले सहयोग मोलाचे असून या महामारीला एकत्र येऊन मात करण्याचा संदेश ही त्यांनी शेवटी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *