वसई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने कोरोनावर मात करण्यासाठी अनेक उपाय योजना आखल्या आहेत.

१४ तारखेचा लॉकडाऊन करण्याच्या निर्णयाला आता पळती देऊन ३० एप्रिल पर्यंत वाढ झाली आहे.
मुंबईसह अनेक उपनगरात अनेक जिल्हात कोरोनाने थैमान घातले आहे.या सगळ्याचा विचार करता राज्यशासनाने ज्या ठिकाणी कोरोनाचे जास्त रुग्ण आढळून येतील त्या …त्या…ठिकाणाला तशी नावे देण्यात आली आहेत.

पालघर जिल्हा रेड झोनमधे

रेड झोन : मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर, रायगड सांगली, औरंगाबाद

ऑरेंज झोन : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, गोदिया

ग्रीन झोन : धुळे, नंदूरबार, सोलापूर, परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली
ही ठिकाणे झोनच्या पट्ट्यात आली आहेत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी काळ जनतेला उद्देश करत असताना सांगितले की जर जनतेने मोठ्या प्रमाणात गर्दीचे ठिकाण टाळले किंवा संचारबंदीच्या नियमांचे पालन केले तर आपण या कोरोना सारख्या संकटाचा लवकरच खात्मा करू शकतो.
आपल्या शब्दांवर जोर देत त्यांनी जनतेला आव्हान केले संचार बंदीचे पालन झाले नाही तर संचारबंदीचा कार्यकाळ वाढू शकतो अशी माहिती त्यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *