
आज बाबासाहेब आंबेडकरांची १२९ वी जयंती.त्या महामानवाला माझा साष्टांग प्रणाम.बाबासाहेब नसते तर आजचा भारत कसा असता या जाणिवेने अस्वस्थ व्हायला होते.बाबासाहेबांनीआधुनिक भारताचा नकाशा बदललेला आहे.त्यामुळे जातीभेदाच्या भिंती पुसल्या जाऊ लागल्या आहेत.
माझ्या लहानपणीच्या आठवणी तितक्याशा गोड नाहीत.बाबासाहेब तेव्हा फक्त दलिताचे नेते होते.असे अनेकांना वाटत आणि अनेकांना ते आपले वाटेनात.चैत्यभुमीवर जमणाऱ्या त्यांच्या समाजाबद्दल नाके मुरडणाऱ्याची संख्या जास्त होती.सरकारी ब्राह्मण म्हणुन त्यांची कुचेष्टा व्हायची.बाबासाहेबांच्या विद्वतेविषयी देखील शंका व्यक्त केल्या जायच्या.भारतीय संविधान बाबासाहेबांनी इकडची तिकडची चार पुस्तके गोळा करुन लिहिली म्हणुन बाबासाहेबांना थट्टेत काढले जायचे.मराठवाडा विद्यापिठाचे नाव बदलुन बाबासाहेबांचे नाव द्यायचे ठरल्यावरुन तत्कालीन मराठा युवकांनी अख्खा मराठवाडा वेठीस धरला होता.
ख्रिश्चनानांही बाबासाहेबांचे विशेष प्रेम होते असे नव्हे.बाबासाहेबांनी आपला धर्म न स्विकारता बौद्धधर्म स्विकारला म्हणुनदेवखील ही अनास्थाअसावी.किंवा जुन्या जमान्यातील पोपनी भारतात जातीपातीच्या व्यवस्थेला मान्यता दिल्याबद्धल आंबेडकरांनी फार पुर्वी पोपमहोदयांवर केलेली टीका लक्षात ठेवुन ते आंबेडकरापासुन दुर राहीले असावेत.एकंदरित माझ्या लहानपणी बाबासाहेबांविषयी व्यापक आदरभावना नव्हती.पण कसे कोण जाणे मला मात्र लहानपणापासून बाबासाहेबांविषयी विशेष आदर आणि कुतूहल असायचे.बाजूच्या महारवाड्यात जायला बरेच कचरत.मी आणि माझी दोस्तमंडळी मात्र तेथील काही मुलांशी मैत्री करुन होतो.
मी अगदी वकीली चालु केली तोवर देखील बाबासाहेबांचा केलेला कुत्सित उल्लेख मी ऐकलेला आहे.पुढे मंडल आयोग आला आणि वातावरण निवळु लागले.बाबासाहेब काय चीज आहे हे बहुसंख्याकांना कळु लागले.आपल्या उन्नतीचे आणि मुक्तीचे मार्ग बाबासाहेबांनी फार अगोदर घटनेत खुले करुन ठेवल्याचे बहुसंख्याकांनाआढळुन आले.स्त्रीयांना बाबासाहेबांनी प्रतिगामी प्रव्रुतीना झुगारुन घटनेत समान हक्क द्यायला लावला.त्यासाठी घटनासमितीचे अध्यक्षपद देखील सोडण्याची त्यांनी तयारी दाखवली होती हे उघड झाले होते.आज बाबासाहेबांचा जो सन्मान बहुसंख्याकांत होतो तो पाहुन माझा उर भरुन येतो.जिवंतपणी बाबासाहेबांच्या नशीबी एवढे भाग्य नव्हते.
अशा या परमपुज्य बाबासाहेबांचा वसईशी विशेष संबंध होता.मागील पिढीतील थोर डॉक्टर सदानंद(सदु)गाळवणकर हे बाबासाहेबांचे परममित्र होते.बाबासाहेब विश्वविख्यात झाल्यानंतरळ दोन वेळा आठवडाभर विश्रांतीसाठी डॉक्टरांच्या घरी राहुन गेले होते.स्वत: डॉ.सदु गाळवणकर गोरगरिबांचे मसिहा होते हे आज देखील जुन्या जमान्यातील मंडळी सांगतील.वसई भुषण जर कुणाला द्यायचे झाले तर त्यात डॉ.सदु गवाणकरांचा क्रमांक पहिला लागेल.कारण त्यांनी जगाला ललामभूत ठरलेल्या बाबासाहेबांचा यथोचित सन्मान केला होता.
माझे आमदार हितेंन्द्र ठाकुरांना आवाहन आहे की त्यांनी लवकरात लवकर पापडी येथील सुशोभित केलेल्या तलावाला डॉ.सदु गवाणकर यांचे नाव देण्यासाठी पाऊले उचलावित..कुणाचा त्याला आक्षेप असेल असे वाटत नाही.
वसईकरांकडुन यापेक्षा अधिक सन्मान बाबासाहेबांचा होईल असे वाटत नाही.