नालासोपारा पश्चिम येथील गेले विस वर्षे प्रख्यात असलेल्या एका
पॅथाॅलाॅजी लॅबोरेटरीमध्ये एका रूग्णाला आपल्या रक्ताच्या चाचण्यांचा आलेला अहवाल पाहून जबर धक्का बसला.मुंबईतील डाॅक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी लगेच मूंबईतील नावाजलेल्या पॅथाॅलाॅजी लॅबोरेटरीमध्ये पुन्हा रक्ततपासण्या केल्या.त्यात त्यांच्या रक्ततपासणी अहवालामध्ये तफावत आढळून आली.याबाबत त्यांनी नालासोपारा येथील पॅथाॅलाॅजी लॅबोरेटरीच्या डाॅक्टरांना याबाबत विचारणा केली असता,त्यांनी सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली.मात्र याबाबत आपण ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करणार आहोत असे सांगितल्यावर सदर डाॅक्टरने आपल्या पॅथाॅलाॅजी लॅबोरेटरीमध्ये केलेल्या रक्ताच्या तपासण्या योग्य रितीने केल्याचे सांगत हात झटकले.दोन दिवसात दोन पॅथाॅलाॅजी लॅबोरेटरीमध्ये केलेल्या तपासण्यांमधील तफावतीबद्दल सदर डाॅक्टरांनी अजब कारण सांगितले आहे. रूग्ण मांसाहार,मद्यपान अथवा गोळ्या घेत असेल म्हणून या तपासण्यांचा अहवाल असा आल्याचा अंदाज त्यांनी लावला.
सदर पॅथाॅलाॅजी लॅबोरेटरीमध्ये दिवसाला ३०० ते ४०० रूग्णांच्या रक्ताच्या तपासण्या केल्या जातात.मात्र यातील ब-याच रूग्णांच्या रक्ततपासण्या योग्य रितीने केल्या जात नसल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.विश्वासापोटी रूग्ण या पॅथाॅलाॅजी लॅबोरेटरीमध्ये रक्ततपासणी करण्यासाठी येत असतात. पॅथाॅलाॅजी लॅबोरेटरीमध्ये केलेल्या तपासण्यानंतर निष्णात डाॅक्टरांनी दिलेल्या अहवालानुसार रूग्ण पुढील वैद्यकीय उपचार घेत असतात.मात्र अशा चुकीच्या तपासण्या या पॅथाॅलाॅजी लॅबोरेटरीमध्ये केल्या जात असल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सदर रूग्णाला जबर मानसीक त्रास झाला होता.लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणविल्या गेलेल्या वृत्तपत्र माध्यमातून या घटनेला वाचा फोडण्यात यावी यासाठी त्यांनी सामाजिक कार्यकर्ते सुनील डिसिल्वा ह्यांच्या कानावर हा प्रकार घातला.त्यानंतर लगेचच सामाजिक कार्यकर्ते सुनील डिसिल्वा,ह्यांनीडॉक्टरांची भेट घेतली.सदर प्रकाराबद्दल त्यांच्याशी चर्चा केली असता डॉक्टरांची भंबेरी उडाली.

लवकरच पहा युवाशक्ती एक्सप्रेसच्या पुढील अंकात व वेब न्यूज वर व्हिडीओ सह संपूर्ण पुराव्यानिशी

नालासोपा-यात पॅथाॅलाॅजी लॅबोरेटरीमध्ये होतोय रूग्णांच्या जिवाशी खेळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *