

२४ मार्च २०२० राेजी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी काेराेणा व्हयरसचा प्रसार राेखण्यासाठी देशात पहिला लाँकडाउन जाहिर केला.१४ ऐप्रिल २०२० पर्यंत सारा देश लाँकडाऊन करण्यात आला.मात्र जनतेने माेठ्या प्रमाणात सरकारला केलेल्या असहकारामुळे.१४ ऐप्रिल राेजी पंतप्रधान माेदी यांनी देशात दुसर्यांदा लाँकडाऊन जाहिर केला.३ मे २०२० पर्यत सदरचा लाँकडाऊन सुरु राहिल.जनतेने काेराेणा विषाणूचा प्रसार राेखण्यासाठी.सरकारला सहकार्य केले नाही तर ३ मे नंतर देखील पुढच्या लाँकडाउन साठी जनतेने तयार रहावे.
मागिल जवळपास एकमहिना केंद्रशासन राज्यसरकार विविध प्रसार माध्यमे जनतेला घरात बसण्याची कळकळची विनंती करीत आहेत.तरी देखील सामान्य नागरिक माेठ्या संख्येने संध्याकाळच्या वेळेस रस्तावर फिरताना दिसत आहेत.काेराेणा विषाणू बराेबरची लढाई ही वेगळे राहून लढायची आहे.आणि त्याचा बिमाेड करायचा आहे.याबाबत सरकार विविध माध्यमाव्दारे जनजागृती करण्याचा आटाेकाट पर्यत्न करित आहे.पण या प्रयत्नांना सुरुंग लावण्याचे काम सर्वसामान्य जनता आपल्या कृतीतून करत आहे.त्याचाच परिणाम लाँकडाऊन चा कालावधी वाढवण्यात आला.
आज भारता सारखा विकसनशिल देश मागिल एक महिना लाँकडाऊन आहे.ही गाेष्ट खरतर देशाच्या अर्थव्यवस्थेस हानीकारक आहे.याचे दुराेगामी परिणाम आपल्या सर्वांना भविष्यात भाेगावे लागणार.याची जाणिव सर्वसामान्य जनतेस नाही का? मागिल जवळपास एक महिन्यात देशाचे अब्जावधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.याला जबाबदार केवळ सर्वसामान्य जनताच! सरकारने घालून दिलेल्या निर्देशांचे काटेकाेर पालन जर सामान्य नागरिकांनी केले नाही विनाकारण शुल्लकशा गाेष्टिंसाठी घराबाहेर पडत राहिले तर जनतेने तिन मे नंतर देखिल पुढच्या लाँकडाऊनला तयार रहावे.आणि याला सर्वस्वी जबाबदार असेल ती सर्वसामान्य जनता.काेराेणा रुपी देशाच्या शत्रूला परास्त करण्यासाठी सरकारच्या निर्देशांचे तंताेतंत पालन करुन आपण खराेखरच देशभक्त आहाेत दे सिध्द करण्याची वेळ आली असून आता निर्णय हा सर्वसामान्य जनतेनेच घ्यायचा आहे.की आपण काेराेणा विराेधाच्या लढाईत काेणाच्या बाजूने आहाेत.
