

पालघर जिल्ह्यामध्ये डहाणु विधानसभा हा आदिवासी बहूल क्षेत्र असून या परिसरात संचार बंदी कायद्याचा उल्लंघन करून काही साधू व्यक्ती प्रशासनास कुठल्याही प्रकारची माहिती अथवा कल्पना न देता अन्य राज्यात जाण्याचा प्रयत्न करीत होते डहाणू परिसरात चोरीच्या अनेक घटना घडल्या होत्या त्यामुळे तेथील नागरिकांनी या साधू लोकांना चोर समजून त्याच्यावर हल्ला केला असता त्यात त्यांच्या मृत्यू झाला आहे पोलीस प्रशासनाने सदर प्रकरणात शंभर हुन अधिक लोकांना तात्कळ अटक केली आहे.व सदर प्रकरणात दोषी असलेल्या सर्व लोकांवर अटक कारवाई सुरु आहे.काही राजकारणी व्यक्ती सदर प्रकरणास हिंदू मुस्लिम वाद दाखवून दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे या प्रकरणाशी मुस्लिम समाजाचा काडीमात्र संबंध नाही तेथील नागरिकांच्या गैरसमज झाल्याने सदरची घटना घडलेली आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सदर प्रकरणास धार्मिक मुद्दा बनवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये केल्यास संबंधित लोकांवर कारवाई केली जाईल असे आव्हान केले आहे.आताचे सरकार हे चांगले काम करत असून भाजप नेते राजकारण करण्याकरिता हे सरकार अपयशी आहे असे सांगत आहेत.मागील भाजप सरकार मध्ये महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडल्या होत्या.त्यावेळी कोणालाही तात्काळ अटक करण्यात आली नव्हती.हे सरकार योग्य पद्धतीने काम करत असल्याने सूडबुद्धीते काही व्यक्ती जाणून बुजून राजकारण करून जातीय तेढ निर्माण करून राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.दिल्लीमध्ये तबलिगी जमात यांनी लोकडाऊन होण्याआधी नियमानुसार परवानगी घेवून कार्यक्रम आयोजित केले होते सदरचे कार्यक्रम लोकडाऊन होण्याअगोदर आयोजित केले गेले होते त्यामुळे उत्तर प्रदेश महाराष्ट्र बिहार व अन्य राज्यातील काही मुस्लिम व्यक्ती सदर कार्यक्रमात गेले होते.केंद्र सरकारने लोकडाऊन जाहीर केल्यानंतर बस,ट्रेन व सर्व ट्रान्सपोर्ट सेवा बंद झाल्याने ते लोक तिथेच अडकून राहिले.तसेच मा.प्रधानमंत्री यांनी जे लोक जिथे आहेत तिथेच राहावे असे वारंवार आव्हान केले होते त्याचा मान ठेवून वरील इसम हे दिल्ली मरगज मध्येच थांबले व दिल्ली येथील पोलीस प्रशासनास पत्र देऊन आम्हाला जाण्याची परवानगी व बस सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली होती तेथील पोलीस प्रशासनाने राज्य शासनाची परवानगी मिळेपर्यंत आम्हाला बस सेवा उपलब्ध करून देता येत नाही असे तेथील नागरिकांना सांगून जाण्याची परवानगी दिली नाही.याचा राजकारण भाजपा नेत्यांनी सुरु केले.भाजपचे काही नेते यांनी कोरोना वायरस मुस्लिम समाजामुळे पसरला आहे असे प्रचार करण्यास सुरुवात केली असल्याने हिंदू मुस्लिम समाजातील लोकांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जातीयवादी व कट्टर पंथी लोकांकडून केला गेला होता.त्यामुळेच वसई तालुक्यात एका व्यक्तीने कोरोना वायरस मुस्लिम समाजातील लोकांनी पसरवला आहे आणि हा वायरस दिल्ली येथील तबलिग जमात मध्ये गेलेल्या लोकांनीच पसरवला आहे मुस्लिम लोकांपासून सावध राहावे असे लिहून फेसबुकवर लिहून पोस्ट केले असल्यामुळे हा प्रकार समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणारा असल्याने त्या व्यक्तीच्या विरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात दिनांक 13/04/2020 रोजी गुन्हा क्रमांक 157/भादविस कलम 295 (अ) 501,188 आयटी ऍक्ट 67 (सी) सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51 (ब) अन्वये दाखल करण्यात आला असून लवकरच सदर व्यक्तीस अटक होणार आहे.त्यामुळे कोणीही दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल असे मजकूर टाकू नये.कोरोना हा अंतर राष्ट्रीय स्तरावर पसरलेला रोग असून संपूर्ण जग यावर काम करीत असून अद्याप याचे औषध बनलेले नाहीत.कोरोना हा रोग फक्त मुस्लिम समाजामुळे पसरला आहे असे खोटे मजकूर पसरून दोन समाजात जातीय तेढ निर्माण करून राजकरण करणाऱ्या लोकांवर महाराष्ट्र सरकार तात्काळ कारवाई करत असल्याने काही राजकारणी लोकांचे धाबे दणाणले असून त्यांचे मनसुबे फेल झाले आहेत तसेच ते महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करण्यास यशस्वी होणार नाहीत असे बहुजन महापार्टीचे महासचिव शमसुद्दीन खान यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.