
वसई (रुबिना मुल्ला) – देशातील परिस्थिती कोरोना सारख्या महामारीशी लढत असताना हलाखीची झाली असल्याने चित्र सर्वत्र दिसून येत आहे.या परिस्थितीला मात देण्यासाठी केंद्र शासनाकडून बजावण्यात आलेले आदेशाचे पालन राज्यातील प्रत्येक नागरिक आपले संयम ठेऊन करताना दिसत आहे.आरोग्य हे मोलाचे आहे या दृष्टिकोनातून बघून कोरोना सारख्या महामारीला संपूर्ण पणे नष्ट करण्यासाठी प्रत्येक शासकीय सेवेत असणारा कर्मचारी वर्ग आपली भूमिका मोलाची बजावताना दिसतो. कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर नियंत्रण करणे व या विषाणूचा संसर्ग वाढू नये या वर प्रतिबंधक उपाययोजना व तपास मोहीम शहरातील प्रत्येक महानगरपालिका आरोग्य सेवेवर सॊपविण्यात आली आहे.ह्या सेवा नागरिकांपर्यंत त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पोहोचविण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेवर ताण निर्माण होत आहे.या संसर्गावर नियंत्रण आणण्याच्या हेतूने प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी दवाखाने व मेडिकल दुकाने नियमित वेळेनुसार सुरू ठेवणे आवश्यक असल्याने प्रशासनाने एका नोटीसीद्वारे बजावले आहे.तरी देखील शासनाच्या या आदेशाचे पालन होत नसल्याने चित्र सर्वत्र दिसून येत आहे. वसई विरार शहर महानगरपालिका तील तालुक्यातील नागरिक चालत्या लॉक डाउन मुळे आरोग्यसुविधा पासून वंचित राहू नये यासाठी शहारातील खाजगी दवाखाने आणि इस्पितळे यांनी त्यांच्या वेळेत दवाखाने उघडे ठेवावेत रुग्णसेवा पुरवावी असा आदेश वसई विरार शहर महानगरपालिका प्रभारी आयुक्त/जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी शहरातील सर्व खाजगी दवाखाने आणि इस्तीपळे यांना दिला आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने जेव्हा महामारीचे परिस्थीती येऊन ठेवली अशा परिस्थितीत हे खाजगी डॉक्टर आपली सेवा देण्यास असमर्थता व्यक्त करत असताना दिसून येत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने शासनाच्या या आदेशावर लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी अन्यथा अशा खाजगी डॉक्टरांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे मत येथील नागरिकांत व्यक्तविले जात आहे.