राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतीने आमदार प्रकाश गजभिये यानी आपली जबाबदारी समजून नागपुर शहरात लॉकडाउन मुळे अडचणीत सापडलेल्या झोपडपट्टीधारकाना मदत करण्याचे ठरवलेले आहे दररोज झोपड़पट्टी धारकाना अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे आज राजनगर झोपड़पट्टी तसेच वसंतराव झॉपड़्पट्टी मधे 2500 गरजू झोपडपट्टीधारकाना वरण भात पोळी व भाजीचे जेवण देण्यात आले.तसेच सर्व झोपड़पट्टी धारकांच्या प्रकुर्तीची चौकशी सुद्धा केलि व त्यांना मास्क व सैनिटाझर वाटप करण्यात आले .यावेळी सीताबर्डी पुलिस स्टेशनच्या पुलिस कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यात यावे यासाठी सर्व झोपड़पट्टी धारकांना पांच फुट अंतर ठेवून लाइन लावण्यास भाग पाडले व कोरोनाचा कोणालाही संसर्ग होउ नये म्हणून शिस्त लावावी असे पोलिसांनी सांगितले .झोपडपट्टीधारकाकडे आता अन्नधान्य नसल्यामुळे उपासमार होत असल्यामुळे त्यांना दररोज जेवण देने आवश्यक आहे म्हणून दररोज झोपडपट्टीधारकांना जेवण देण्यात येईल असे आमदार प्रकाश गजभिये यांनी सांगितले यावेळी सुनील भाई ,आशीष लोबो,मनोज नागपुरकर,मदन श्रीवास व रवि नागपुरकर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *