पालघर जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांची तत्काळ मदत

पालघर – नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्राच्या समन्वयातून महाराष्ट्रभर अनेक जिल्ह्यात मदतीचा ओघ चालू आहे.
एनयुजे महाराष्ट्र अध्यक्षा शीतलताई करदेकर यांनी कोरोना महामारीच्या या काळात युनियनच्या माध्यमातून राज्यभर लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या गरजूंना मदतीसाठी समन्वय सहकार्याचे सत्र सुरू ठेवले आहे. एन यु जे एम चे पालघर जिल्हाध्यक्ष विजय देसाई यांनी नालासोपारा पश्चिमेकडील फन फियेस्टा येथे मदतीसाठी पालघर जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे व वसई प्रांत अधिकारी स्वप्नील तांगडे यांच्या निदर्शनास आणून दिले.
दुसर्‍या दिवशी लगेच त्यांच्या आदेशाचे पालन होत. मांडवी मंडळ अधिकारी सुशांत ठाकरे यांनी वसई विरार महानगरपालिकेच्या गाडीने नरेश जाधव यांनी ३० कुटुंबाना घरपोच कीट दिले त्यामुळे त्या कुटुंबांनी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्राच्या अध्यक्ष शीतल करदेकर ,पालघर जिल्हाध्यक्ष ,विजय देसाई व डॉ. कैलास शिंदे ,वसई प्रांत स्वप्नील तांगडे, मांडवी मंडळ अधिकारी सुशांत ठाकरे यांचे व शासनाचे आभार मानले.यांनी डाळ ,तांदूळ, कांदे, बटाटे, गोडेतेल या जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत पोहचवली आणि मजूर बांधवांना दिलासा मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *