

प्रतिनिधी
विरार : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सरकारने घेतलेल्या ‘लॉकडाउन’ काळात वसई-विरार शहरातील एकही नागरिक उपाशी झोपणार नाही, असे आश्वासन आमदार हितेंद्र ठाकूर व युवा आमदार क्षितिज ठाकूर यांनी दिले होते. याच वचनाची पूर्तता नगरसेवक अजीव पाटील आणि स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांच्या माध्यमातून शेकडो तृतीयपंथी कुटुंबांना शनिवारी धान्य स्वरूपात मदत करून करण्यात आली.
मनवेल पाड़ा, मोरगांव आणि नालासोपारा भागातील काही तृतीयपंथींनी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. याची दखल घेऊन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी; नगरसेवक अजीव पाटील आणि स्थायी समिती सभपती प्रशांत राऊत यांना या सगळ्यांना आवश्यक ती मदत तातडीने देण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार या कुटुंबांना नगरसेवक अजीव पाटील व स्थायी समिती सभपती प्रशांत राऊत यांच्या माध्यमातून तांदूळ, तूरडाळ, साखर, चहा पावडर, कांदे, मीठ, चणे इत्यादी साहित्य वाटप करण्यात येत आहे.


