
मुख्यमंत्री ना.मा.उद्धवजी ठाकूर आमदार क्षितिज ठाकूर समाजसेवक तसनिफ नूर शेख
प्रतिनिधी
वसई : वसई-विरार शहरात वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण हे मुंबईतील रुग्णालय, हॉटेल्स आणि अत्यावश्यक सेवेत काम करणारे आहेत, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर आणि महापौर प्रवीण शेट्टी यांनी वसई-विरारहून मुंबईत अत्यावश्यक सेवा देण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची राहण्या-जेवणाची व्यवस्था मुंबईत करावी, अशा आशयाचे पत्र ११ एप्रिल २०२० रोजी दिले होते; मात्र या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय कार्यवाही केली, याचा खुलासा आमदार क्षितिज ठाकूर यांनी करावा, अशी विनंती वसईतील सामाजिक कार्यकर्ता तसनीफ़ नूर शेख यांनी केला आहे.
२७ एप्रिल रोजी वसई-विरार शहरात नवीन सात कोरोना रुग्ण आढळले आहेत. यातील बहुतांश व्यक्ती मुंबईतील रुग्णालयात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आहेत. या आधीही आढळलेले रुग्ण हे मुंबईत ये-जा करणारे असल्याचे दिसून आले आहे.
हे सर्वजण अत्यावश्यक सेवा देणारे आणि कोरोना युद्धात महत्त्वपूर्ण काम करणारे असल्याने त्यांच्यासह अन्य सामान्य जनतेची काळजी घेणे, हे प्रशासनाचे काम आहे. मात्र मुंबईत ये-जा करणाऱ्या व्यक्तीची मुंबईतच राहण्या-जेवणाची सोय झाल्यास या व्यक्तीच्या माध्यमातून वसई-विरार शहरात येणाऱ्या कोरोना संसर्गाला आळा घालता येईल. शिवाय शहरात कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवता येईल, असे मत सामाजिक कार्यकर्ता तसनीफ़ नूर शेख यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान; वसई-विरारमधून मुंबईत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तीची सोय मुंबईत करावी, असे पत्र युवा आमदार क्षितिज ठाकूर आणि महापौर प्रवीण शेट्टी यांनी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. ही कामगिरी प्रशंसनीय आणि अत्यावश्यक सेवेतील योद्वयांची काळजी करणारे असली तरी; या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय कार्यवाही केली किंवा त्यांच्याकडून काय उत्तर आले; याचा खुलासा करावा, अशी मागणी तसनीफ़ नूर शेख यांनी आमदार क्षितिज ठाकूर यांच्याकड़े केली आहे.