नालासोपारा : दोन महिन्यापूर्वी हरीण पाळल्या नंतर वन विभागाने केलेल्या कारवाईची बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून चौघांनी जमाव जमवून पत्रकाराच्या घरात शिरून त्याला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी विरार पूर्वेच्या कोपरी गावात घडली आहे. याप्रकरणी पत्रकाराने दिलेल्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाण्यात प्रभाकर ओघे, निखिल ओघे, बंटी ओघे व राजेश ओघे या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एन संचारबंदित व लॉकडाऊन मध्ये जमाव जमवून केलेल्या या मारहाणीमुळे कोपरी गावात तणावाचे वातावरण पसरले होते.
दोन महिन्यांपूर्वी विरारच्या कोपरी गावातील एका बंगल्यात डांबून ठेवलेल्या हरणाची सुटका करण्यात मांडवी वन विभागाला यश आले होते. माध्यमांनीही हा प्रकार निर्भीडपणे जनतेच्या समोर मांडला होता.. याप्रकरणी प्रथमेश ओघे व त्याच्या साथीदाराला वनविभागाकडून अटक करण्यात आली होती. बंगल्यात हरण डांबून ठेवले असल्याची गुप्त माहिती वनविभागाला पाटील यांनीच दिल्याचा आरोप करत रविवारी सकाळी ओघे कुटुंबीयांनी जमाव जमवून पत्रकार विपुल पाटील व त्यांच्या आईस मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.या प्रकाराबाबत सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
दरम्यान नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर व पालघर जिल्हाध्यक्ष विजय देसाई.यांनी हे प्रकरण जरी २ महिन्या पूर्वीचे असले तरी ते बातमी केल्या संदर्भातील असून त्या आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करायला हवाच ही मागणी युनियनने केली आहे.

पत्रकार आपलं काम करत असताना राजकीय वरदहस्त आहे म्हणून त्यांचेवर दादागिरी करत दबाव टाकून वातावरण भयभीत करणे हे समाजविघातक कृत्य आहे आणि आपत्तीव्यवस्थापन कायदा लागू असताना तो मोडणे हे प्रकार झुंड गुंडशाहीचे लक्षण आहे.
आणि अशा लोकांवर वेळीच उपचार केले नाहीत तर ते लोकशाहीस धोकादायक आहे पोलीस उचित कठोर कारवाई पोलीस संरक्षण कायद्याअंतर्गत करुन विपूल पाटील व कुटुंबियांचे जीवितास धोका होउ नये याची काळजी घेतीलच असे स्पष्ट मत शीतल करदेकर यांनी व्यक्त केले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *