मुंबई :- बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांची काल तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते माञ आज उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. इरफान मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल केले होते. अलीकडे इरफान खानची आई सईदा बेगम यांचे निधन झाले. त्यावेळी अशा बातम्या आल्या होत्या की लॉकडाऊनमध्ये घरापासून दूर असल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अभिनेत्याने अंतिम दर्शन घेतले होते. इरफान खानने मुंबईतील अंधेरी येथील कोकीळा बेन रूग्णांलयात अखेरचा श्वास घेतला .

अतिशय हालाकिच्या परिस्थितीवर मात करून त्यांनी बाॅलिवुड जगतात आपले नाव केले होते. दोन वर्षांपूर्वी मार्च 2018 मध्ये इरफानला त्यांच्या आजाराचे निदान झाले होते. त्याने स्वत: ही धक्कादायक बातमी आपल्या चाहत्यांना दिली. त्याने आपल्या आजारपणाचा खुलासा ट्वीटद्वारे केला होता – आयुष्यात अचानक असे काहीतरी घडते जे आपल्याला पुढे घेऊन जाते. माझ्या आयुष्यातील शेवटचे काही दिवस असेच होते. मला न्यूरो-एंडोक्राइन ट्यूमर नावाचा आजार आहे. पण तुमचे प्रेमाने मला लढण्याची शक्ती दिली आहे. असे त्यांनी लिहिले होते माञ आज इरफान यांच्या जाण्याने बाॅलिबुडमध्ये पोकळी निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *