
वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी दवाखाने सुरू ठेवण्याबाबत मा. जिल्हाधिकारी, पालघर ह्यांनी वेळोवेळी निर्देश दिले आहेत. तरीही महापालिका क्षेत्रातील बहुतांश खाजगी हॉस्पीटल बंद असल्याचे निदर्शनास येत आहे. महापालिकेमार्फत प्रभाग समिती एच, नवघर माणिकपुर येथील फक्त एका हॉस्पीटलवर कार्यवाही करण्यात आलेली आहे. वास्तविक पाहता महापालिकेने त्यांचे कार्यालयाकडील पत्र क्र. ६१५०/२०१९-२०, दिनांक ३१-०३-२०२० नुसार पालिका हद्दीतील बंद असलेल्या खाजगी हॉस्पीटल व दवाखान्यांच्या डॉक्टरांनी दवाखाने उघडण्याबाबत नोटीसा दिलेल्या होत्या. परंतु फक्त एका डॉक्टरवर कार्यवाही करून महापालिका आपली जबाबदारी झटकत असल्याचे येथील नागरीकांमध्ये चर्चा आहे.
आज रोजी वसई विरार महापालिका क्षेत्रामध्ये बहुतांश खाजगी हॉस्पीटल, दवाखाने, क्लिनीक बंद असल्याचे निदर्शनास येत असून महापालिका कार्यवाही करण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे नागरीकांमध्ये संताप वाढत आहे. म्हणूनच या संवेदनशील प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक, पालघर ह्यांनी व्यक्तीश: लक्ष घालून येथील खाजगी दवाखाने तपासणीची पथक गठीत करण्याबाबत सामाजिक कार्यकर्ता तसनीफ शेख ह्यांनी मागणी केली आहे.