

सध्या संपूर्ण भारतासह महाराष्ट्रातही त्याचप्रमाणे आपल्या पालघर जिल्ह्यातही कोविड १९ या संसर्गजन्य रोगाच्या महामारीमुळे लॉक डाऊन चालू आहे. अशावेळी आपला पालघर जिल्हा हा रेड झोन मध्ये असून सुद्धा केंद्र व राज्य प्रशासनाच्या नियमानुसार आपले वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन या नियमांची अंमलबजावणी करण्यास व नियोजन करण्यास असमर्थ ठरत आहे. याचे सर्वोत्तम उदाहरण वसई गाव, नालासोपारा, विरार येथे दिसून येत. सध्या वसई गावांची परिस्थिती पाहता तेथील वसई भाजी मार्केट, होळी मार्केट, वसई चिमाजी अप्पा मैदान, भास्कर आळी, व सुरुची बाग इथे आवश्यक तसेच अनावश्यक दुकाने, उघडी ठेवली जातात, भाजी पाला, फळ विक्रेते बाजू बाजूला त्यांची ठेले लावून बसतात, मच्छी विक्रेते असतात. आता ह्या सर्वांच्या निष्काळजी पणा मुळे गर्दी वाढते आणि सामाजिक अंतराचे नियम मोडले जातात जे अतिशय घातक आहे. तसेच दुकानदार किंवा विक्रेते स्वतः चुकून मास्क व ग्लोज वापरतात, तसेच स्वतः साठी आणि ग्राहकांसाठी सेनेटायझर चां वापर केला जात नाही. तसेच पेट्रोल पंप इथे फक्त शासकीय वाहने, व अत्यावश्यक सेवा पुरवणारे वाहन यांनाच पेट्रोल डिझेल भरण्याची परवानगी असताना इतर नागरिकांना त्यांच्या वाहनासाठी पेट्रोल मिळते कुठून..?? तसेच हा सर्व कारभार पाहण्यासाठी अथवा रोखण्यासाठी जे महापालिकेचे कर्मचारी अथवा पोलीस येतात पण काहीच न करता जातात मग हे येतात तरी कशाला..?? त्यांना विचारले तर त्यांचं ठरलेले उत्तर असते, ” हे काम आमचे नाही, xxx ह्यांच आहे ” मग मुळात हे काम नक्की कोणच आहे…?? अशी एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहे. आता ह्या परिस्थितीवर जर नाही नियंत्रण मिळवले तर येणाऱ्या दिवसात ह्याचे गंभीर परिणाम आपना सर्वांना भोगावे लागणार आहेत. त्यामुळेच महापालिका प्रशासनाने व पोलीस यंत्रणेने यावर नीट लक्ष देऊन जर खबरदारी घेतली तर आपण पुढील धोका नक्कीच टाळू शकतो