
एनयुजे महाराष्ट्र ने जिंकली सन्मानाची लढाई!
विरार : लोकशाहीचा चौथा स्तंभ इतर स्तंभाइतकाच महत्वाचा आहे, कारण इतर तीनही स्तंभासाठी पोषक आणि लोकशाही बळकट करणारा हा स्तंभ आहे. इतर तिघांसाठी आहे इतकी सुरक्षा कधीही दिली जाणार नाही हे नक्की च पण चौथ्या स्तंभाचा सन्मान खूप महत्त्वाचा! समाजात वावरताना तो असायला हवाच!या भूमिकेतून एनयुजे देशभरात काम करतेय.
एनयुजेमहाराष्ट्रही ठामपणे सक्षम समाज व सन्माननीय पत्रकारितेसाठी सकारात्मक बदलासाठी माध्यमकर्मींसोबत मजबुतीने उभी आहे! पत्रकारांना खिजगणितीत मानून दमन करण्याच्या प्रवृत्तीविरोधात निडरपणे काम करते आहे.
दोन महिन्यापूर्वी च्या बातमीचा आकस ठेवून विरारमधे विपुल पाटील यांना मारहाण झाली.
विरार पोलिसांनी पत्रकार विपुल पाटील मारहाण प्रकरणी प्रभाकर ओघे, निखिल ओघे, बंटी ओघे व राजेश ओघे यांना अटक करूनकारवाई केली. त्यांच्याकडून पत्रकार व त्याच्या कुटुंबियांना धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेवून विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी त्यांच्या विरोधात ३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांचे मार्गदर्शनाखाली पालघर जिल्हाध्यक्ष विजय देसाई यांनी हे प्रकरण जरी २ महिन्या पूर्वीचे असले तरी ते बातमी केल्या संदर्भातील असून त्या आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करायला हवाच यासाठी पाठपुरावा केला. पोलीसांकडूनही चांगले सहकार्य मिळाले.
सर्वत्र कोरोनाचे संकट लक्षात घेता व सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम तुगावे,पोलीस उपनिरीक्षक खंडाळे यांनी दोन्ही बाजूच्या लोकांना एकत्र बोलावून सुवर्णमध्य काढला!
आरोपींनी पत्रकार विपुल पाटील व त्यांच्या कुटुंबियांची जाहीर माफी मागितली असून यापुढे त्यांना कोणताही त्रास देण्याची हमी दिली.
तसेच बातमी जुनी असल्याने त्यात काही तांत्रिक अडचणी येत असल्याने व पोलिसांवर असलेला ताण वाढू नये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र अध्यक्ष शीतलताई करदेकर व पालघर जिल्हाध्यक्ष विजय देसाई.यांनी पोलिसांच्या विनंतीला मान दिला.
विपुल पाटील व ओघे परिवार एकाच गावातील शेजारी!माफी मागून आणि त्रास देणारेंना यापुढे असे कृत्य होणार नाही अशी जाहीर कबुली दिल्याने या प्रकरणी गावातही सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे!