


प्रतिनिधी:- कोरोनामुळे आलेल्या लॉकडाऊनचा सामना करताना जीवनावश्यक वस्तूंचा साठा संपत चालल्याने अनेकांचं कंबरडं मोडलं आहे. यामुळे जैस्वाल सामाजातील अनेक संस्थांनी मुंबई, ठाणे, पोईसर, बोईसर आणि अलिबाग परिसरातील जवळपास पाच हजार कुटुंबांना मोफत अन्नधान्य दिले आहे.
दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लॉकडाऊन परिस्थितीचा सामना करताना अपुऱ्या धान्यसाठ्यामुळे अनेक कुटुंबांचे फरफट होत आहे. त्यातच घराबाहेर पडल्यानंतर बंदोबस्तामुळे दुकानापर्यंत जाण्यासह अनेक नागरिक टाळत करत आहेत.
यामुळे जैस्वाल युश फेडरेशन आणि सरस्वती देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने समाजातील गरजू लोकांना मोठा दिलासा देण्याचे काम जैस्वाल समाजातील संस्था करत आहेत.
सध्याच्या काळात नागरिकांना दोन घास मिळणं आवश्यक आहे. त्यासाठी अन्नधान्याचा पुरवठा व्हायला हवा. अनेकांचे पोट त्यांच्या हातावर आहे. अनेक उद्योगधंदे ठप्प असल्याने नागरिकांच्या हाताशी दोन पैसेही नाहीत. अशा सर्वच गरजुंना मदत करण्यासाठी आम्ही पुढाकार घेत असल्याचे सरस्वती देवी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त संदीप व राजदीप गुप्ता यांनी सांगितले