

अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देविदास जयवंत केंगार व संस्थेचे पदाधिकारी यांनी वसई तहसीलदार कार्यालयातील संजय गांधी योजनांची माहिती घेण्यासाठी वर मजल्यावर जाण्यासाठी त्रास होत आहे त्यामुळे संजय गांधी विभाग तळ मजल्यावर घेण्यात यावा.तसेच वसई पंचायत समिती कार्यालयातील दिव्यांग विभाग मधील दिव्यांगाणा शासकीय योजनांची माहिती घेण्यासाठी वर मजल्यावर जाण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे ह्या मुळे वसई पंचायत समिती मधील दिव्यांग विभाग तळ मजल्यावर घेण्यात यावा यासाठी अपंग जनशक्ती संस्थेने अनेक वेळा जिल्हाधिकारी पालघर , वसई तहसीलदार तसेच पंचायत समिती वसई यांना निवेदन तसेच आपले सरकार या पोर्टल वर ऑनलाईन तक्रार दाखल केली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने पालघर जिल्हाधिकारी यांनी वसई तहसीलदार व वसई पंचायत समिती यांना दिव्यांग विभाग तळ मजल्यावर घेण्यासाठी आदेश दिले असता वसई पंचायत समिती मधील दिव्यांग विभाग तळ मजल्यावर घेण्यात आला आहे.
वसई तहसीलदार कार्यालय यांनी संजय गांधी योजना शाखा तळ मजल्यावर घेण्याची तजवीज ठेवली आहे.तसेच गट विकास अधिकारी , पंचायत समिती वसई यांनी दिव्यांग लाभार्थींना योजनांची माहिती व कार्यालयीन कामकाजासाठी ये – जा करणे अवघड होत असल्याने फिव्यांग लाभार्थींना योजना व माहिती देण्यासाठी तसेच कार्यालयीन कामकाजासाठी कार्यालयाच्या तळ मजल्यावर कृषी विभागामध्ये निर्माण करण्यात आलेला आहे.सदर कक्षामध्ये कार्यालयीन कामकाजासाठी कनिष्ठ सहाय्यकाची नेमणूक करण्यात आलेली आहे असा अहवाल सादर करण्यात आला आहे.
असे पालघर जिल्हाधिकारी यांनी अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देविदास जयवंत केंगार यांना दिलेल्या पत्रकात नमूद आहे.