
भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा पन्नास हजारावर जाऊन पोहचला आहे.केवळ दोन महिन्यात कोरोनाने भारतभर हातपाय पसरलेले आहेत.भविष्य भितीदायक आहे.याला कारण काय आणि यावर उपाय काय याचा गांभीर्याने विचार करण्याची ही वेळ आहे.त्याअगोदर शास्त्रज्ञांची यावर काय भुमिका आहे हे तपासणे आवश्यक आहे.मागे मी कोरोनाबद्दल लिहिले होते त्यावेळी काहींनी कोरोनाचे कारण काय याची माहिती मागितली होती.त्यामुळे आपण मुळाशी जाऊन काही तथ्य तपासुन पाहु.
पुलित्झर प्राईज मिळविणार्या लाँरी ग्यरेट यांन गेल्या दहावर्षापासुन धोक्याची घंटा वाजवली होती.जगात कोरोना व्हायरस थैमान घालणार आहे असे भविष्य त्यांनी तेव्हा वर्तवलेले होते.त्यांचे म्हणणे असे आहे की कोरोना व्हायरसच्या लाटावर लाटा येणार आहेत. .तसे झाले तर काही महिन्यांत करोडोंच्या संख्येने माणसे मरुन जगभर मातम माजेल.चिंतेने घालमाल व्हावी अशी ही बातमी आहे.विशेष करुन ज्यांनी गेली काही वर्षे उलथापालथ करुन करोडोंची माया जमविली त्यांची झोप उडेल.हेच फळ काय मम तपाला अशी त्यांची परिस्थिती ह़ोईल.गरीबांचे काय? ते दरदिवशी मरण भोगित आहेत.त्यांच्या द्रुष्टीने दरदिवशीच्या मरणात अधिकची एकाची भर.कोरोनाने सगळ्यांना एकाच मापात मोजायला घेतले आहे.
कोरोना हा एक विषाणु आहे.कोविड-१९हा कोरोनाचा उत्क्रांत अवस्थेतीजल विषाणु आहे.या विषाणुवर येते वर्षभर खात्रीलायक औषध सापडणार नाही.ही सत्यस्थिती नाकारता येणार नाही.ज्यांना ईकाँनाँमी उघडायची घाई झाली आहे ते सत्य लपवु पहात आहे.तुमचा माझा बळी गेला तर त्याची त्यांना पर्वा नाही.त्यांना फक्त पैसा दिसतो.
विषाणु संदर्भात १९५३ पासुन गंभीर संशोधनाला सुरवात झाली.विषाणुचे संशोधन करणारे संशोधक व्यापक माहिती गोळा करु लागले.१९८० पर्यंत एच.आय.व्ही.च्या विषाणुने आपले रौद्र रुप दाखवायला सुरवात केली त्यानंतर जगभरातील सरकारे हादरायला सुरवात झाली.एच.आय.व्ही.चा विषाणु खतरनाक होता. त्या काळातील संशोधकांनी धोक्याची घंटा वाजवली होती.ऐहिक भोगाच्या परिणामांची त्यांना जाणिव होऊ लागली होती.त्यांनी जगाला त्याची कल्पना दिली.जगाच्या सुदैवाने हा विषाणु केवळ असुरक्षित लैंगिक संबंधातुन आणि दुषीत सिरिंज मधुन पसरतो हे लक्षात आल्यामुळे या रोगाला वेळीच आळा बसला.सुरक्षित लैंगिक संबंधाचे महत्त्व आणि निर्जंतुकीकरणाची खबरदारी घेतल्याने बळींची संख्या मर्यादित राहिली.वैद्यकीय क्षेत्रातील झपाट्याने विकसित झालेले तंत्रज्ञान देखील माणसांच्या मदतीला धावुन आले.झालेल्या संशोधनातुन एक गोष्ट सिद्ध झाली. या रोगाची उत्पत्ती प्राण्यामध्ये झाली आणि पुढे तो माणसामध्ये संक्रमित झाला हे सिद्ध झाले.प्रत्येक विषाणुचा हाच प्रवास आहे.त्यानंतर सार्स,मर्स सारख्या विषाणुंनी आपली विषारी मगरमिठीची प्रचिती माणसाला आणुन दिली.त्यानंतर विषाणुच्या संशोधनाला प्रचंड गती आली.
दुसरीकडे मानवी प्रगतीला न भुतो न भविष्यती अशी गती आली.गेल्या ४०वर्षामध्ये झालेली प्रगती पहा.ज्यांच्या पदरी सायकल लागत नव्हती त्यांच्या बंगल्यासमोर चार चाकी झुलु लागल्या.ज्यांना पायताणे लागत नव्हती त्यांचे पाय वुडलँण्ड शुज मिरवु लागले.डोळे विस्फारून जातील ईतका पैसा एक एका कडे साठु लागला. हे सगळे कोणत्याही बलीदानाशिवाय शक्य नव्हते.हे बलीदान प्रुथ्वीचे होते.प्रगतीने पर्यावरणाचा पहिला बळी घेतला.सगळ्या सुष्ट्रीची वाताहात झाली.जगाचे तापमान वाढले.ग्लोबल वाँर्मिंगचे दुष्परिणाम दिसु लागले.१८५६ साली भुगर्भातील जैविक ईंधन काढण्यात माणसाला यश आले होते.त्याचे प्रताप अवघ्या दोन वर्षात शास्त्रज्ञांना अनुभवावयाला आले होते.त्याचा अत्यंत घाणेरडा वास हुंगल्यावर त्यांनी या ईंधनाला शैतानका मलमुत्र म्हणुन उपाधी दिली होती.त्यावेळी त्यांना कोठे ठाऊक होते की अवघ्या दिडशे वर्षात हे मलमुत्र प्रुथ्वीच्या विनाशाला कारणीभुत ठरणार आहे.
गेल्या २० वर्षात शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रचंड संशोधनातुन हिच भिती व्यक्त केली गेली. विषाणु उत्क्रांत पावत आहेत. त्याचे कारण जगाचे वाढते तापमान आहे.प्रुथ्वीची धुळधाण थांबवली तर कुठे प्रुथ्वी वाचण्याची शक्यता आहे.पण थांबायला कोणीच तयार नाही.उलट जग डोनाल्ड ट्रंपसारख्या हावरट नेत्यांच्या कच्छपि लागली आहे. आता अचानक रंगात आलेल्या पार्टीचा बेरंग व्हावा त्याप्रमाणे कोरोनाचा घाला मनुष्यजातीवर पडला आहे.आज भविष्य अंधकारमय बनलेले आहे. लाँरी ग्यरेट यांचे भाकित खरे मानले तर येत्या काही महिन्यांत किंवा वर्षात भयानक विषाणु जगात हाहाकार माजवणार आहेत.आता आपण रिटर्न जर्नीला लागलो पाहिजे.कोरोनावर लस सापडल्यावर पुन्हा आपली पार्टी रंगात येईल याची स्वप्ने सोडुन द्या.ती वेळ कधीच निघुन गेली आहे.
प्रथम कोरोनापासुन आपला बचाव कसा करता येईल ते पहा.Stay Home,Stay Safe हा शास्त्रज्ञांनी दिलेला सल्ला विसरु नका.शोशल डिस्टनसिंगचे विस्मरण होऊन देवु नका.दारुसाठी दंगा करु नका.ही लढाई आपल्याला जिंकायची आहे.जगाला शांतता प्रदान करण्याची जबाबदारी आपली आहे.प्रुथ्वीचे तेव्हढे ऋण आपल्यावर नक्कीच आहे.