

बातमीतील चुकांसाठी माध्यमांवर खटल्यांचे औचित्य सिध्द करता येत नाही- न्या जी.आर. स्वामीनाथन
बातमीतील काही चुकांमुळे माध्यमांवरील खटल्याचे औचित्य सिद्ध केले जाऊ शकत नाही ,या मद्रास हायकोर्टाने केलेल्या टिपणीचे व निर्णयाचे देशातील पत्रकारांची प्रमुख संघटना नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स-इंडिया (एनयूजे आय) ने स्वागत केले आहे
प्रत्यक्षात एका प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी.आर. स्वामीनाथन यांनी म्हटले की, काही शक्तिशाली राजकारणी आणि उद्योगपती प्रसारमाध्यमांच्या विरोधात मानहानीची प्रकरणे ‘धमकावण्याचे साधन’ म्हणून वापरत आहेत. परंतु जेव्हा मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची बाब येते तेव्हा उच्च न्यायालये आपले कर्तव्य सोडणार नाहीत. त्यानंतर न्यायालयाने एक प्रख्यात वृत्तपत्र आणि दोन पत्रकारांविरूद्ध केलेली मानहानीची कार्यवाही रद्द केली.
एनयूजेआय चे अध्यक्ष रास बिहारी आणि सरचिटणीस प्रसन्ना मोहंती यांनी एक संयुक्त निवेदननात म्हटले आहे की, एनयूजे आय ने मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करते आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर दबाव आणणार्या , पत्रकारांच्या स्वातंत्र्याला चिरडून टाकणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणार्या संपूर्ण कॉर्पोरेट आणि राजकारण्यांसाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरेल असेही या निवेदनात म्हटले आहे.
एनयुजे महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांनीही या निर्णयाचे स्वागत करताना, पत्रकारांनी आपले मूलभूत हक्कासाठी जागरूक असले पाहिजे