
देशासह राज्यामध्येही दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे महाराष्ट्र्रातील पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यामुळे येथे जव्हार पालघर विक्रमगड डहाणू येथील आदिवासी हे मजूर कामासाठी वसई येथे मोठया प्रमाणात आहेत तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अचानक लॉक डाउन घोषित करण्यात आले, त्या मुळे कामगार मजुरांवर आर्थिक संकट कोसळले आहे. या काळात काम नसल्याने आदिवासी मजुरांचे जगण मुश्किल होत चालले आहे, तसेच शासनाचे लाभ त्यांच्या पर्यंत पोहचत नसल्याने त्यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आली त्यामुळे त्यांना निदान त्यांच्या मूळगावी पाठवण्याचे व्यवस्था शासनाने करावे असे मागणी आदिवासी एकजूट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुमार शेरु वाघ यांनी केले आहे.