भारतात कोरोना व्हायरसचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत.सत्तर हजारांचा आकडा पार झाला आहे.ईंग्रजीमध्ये एक्सपोनेन्शियल कर्व्ह नावाची एक संकल्पना आहे. रेषा जेव्हा छप्पर फाडुन पुढे पळते तेव्हा तिला एक्सपोनेन्शियल कर्व्ह आलेला आहे असे म्हणतात.३०एप्रिल पर्यंत कोरोना बाधितांची संख्या ३१हजार होती.११मे पर्यंत ती ७०हजारापार गेलेली आहे. कुठेतरी चुकतय असे म्हणायला हवे.आतापर्यंत उचललेली पावले घिसाडघाईने उचलली होती की अतिआत्मविश्वास नडला हे तपासले पाहिजे. तपासण्याची ही वेळ आहे.उशीर केला तर फार मोठा धोका संभावु शकतो.केंन्द्र सरकार आणि आपण कोठे चुकलो ह्याचा अभ्यास केला तर पुढच्या चुका टळु शकतात.कोरोनावर मात करण्यासाठी केंन्द्र सरकार खरोखर कार्यरत होते की त्याआडुन राजकारण चालु होते?राजकारण सर्व प्रश्न निकाली लावते.अमेरिकेत तेच चालु आहे.
२४मार्चला केन्द्र सरकारने अचानक लाँकडाऊन चालु केला.हा स्टंट झाला.त्याअगोदर केंन्द्र सरकार जागरुक नव्हते. त्याचा पुरावा आहे.१८मार्चला राज्यसभा चालु होती.काही विरोधी खासदार तोंडाला मास्क लावुन आलेले होते.त्यांना व्यंकय्या नायडुंनी खडसावले.बाहेर जा आणि मास्क काढुन या.नाहीतर कारवाई करीन.अनेकदा ओरड होऊनही २३मार्च पर्यंत मोदींनी संसद चालु ठेवली होती.मग आले देवाजीच्या मना प्रमाणे लाँकडाऊन जाहीर झाला.त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचा कोणताही अभ्यास केन्दाने केला नव्हता.लाँकडाऊनचा मुख्य उद्देश कोरोनाचा फैलाव रोखण्याचा होता.पण अचानक लाँकडाऊन केल्यामुळे देशांतील करोडो कामगारांची हालत झाली.अचानक पोटापाण्याचा मार्ग बंद झाला.लाँकडाऊन१४एप्रिलला देखील उठणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पळ काढण्यास सुरवात केली.त्याला पर्याय नाही हे त्यांच्या लक्षात आले.माणसामध्ये एक उपजत बुद्धी असते.जीवावर बेतणार म्हटल्यावर ती आपोआप जागरुत होते.मजुरांनी पळ काढायचे ठरविले.सरकारने काळजी घेतो म्हणुन कितीही सांगितले तरी सरकार काळजी घेऊ शकणार नाही हे त्यांना पुरेपुर ठाऊक होते.आज सर्वत्र चाललेली ओरड बघा.सुरवातीला खिचडी सोबत रायता,केळे आणि एखादी मिठाई दिली जायची.आज केवळ एकवेळ चण्याफुटाण्याची डाळ आणि दोन चपात्या दिल्या जातात.तेही ज्यांचे नशीब आहे त्यांना मिळते.ते जेवण(?) घशाखाली उतरत नाहीत अशी अनेकांची तक्रार आहे.असे काही होईल याची कल्पना केन्द्र सरकारला का नाही आली? लाँकडाऊनचा पिरियड संपल्यावर१४एप्रिलला जादुची कांडी फिरवल्याप्रमाणे कोरोना आपोआप निघुन जाईल असे सरकारला वाटले.आजही लाँकडाऊन संपविण्याची सरकारमध्ये हिंमत नाही.
अचानक जाहीर केलेल्या लाँकडाऊनमुळे सामान्य माणसांचे फार हाल झाले.रात्री बेरात्री कोठुन खबर आली रे आली की लोक वस्तु मिळविण्यासाठी जिथेतिथे धावु लागले.शोशल डिस्टनसिंगची तेथेच वाट लागली.लाँकडाऊनच्या उद्देशाला प्रथमग्रासे मक्षिकाप्राते झाला. मजुरांचे तांडेच्या तांडे गावी निघाले.रेल्वे बंद.बसेस बंद.खाजगी वाहने बंद.जागोजागी पोलीसांचा पहारा.डोळा चुकवण्याच्या प्रयत्नात लाखो वाहने जप्त. मजुरांच्या नशीबी तंगडतोड आली.कोरोनाला पोषक असे वातावरण तयार झाले.लाँकडाऊन फसणार याची चिन्हे दिसु लागली.मग राजकारण आले.मरकजचे तबलिगी आपोआप सापडले.मिडीयाद्वारे मुसलमानांना मरकजच्या माध्यमातून टार्गेट करण्यात आले.पुढे कोरोनाने थैमान घातलेच तर आधीच बळीचा बकरा बांधुन तयार ठेवावा हा त्यामागचा उद्देश.आतंरराष्ट्रीय स्थरावरुन जेव्हा टीकाटिपण्णी झाली तेव्हा नशा उतरली.या सगळ्या गदारोळात मजुर मात्र होरपळला.शेकडो मैलांची पायपीट करणाऱ्या या मजुरांपैकी अनेकांना आपले जीव गमवायला लागले.डॉक्टरांसाठी देशाने टाळ्या वाजवल्या.भांडी वाजवली.पोलीसांसाठी पणत्या पेटवल्या.प्रकाशझोत फेकले.पण मजुरांना देश विसरला.जणु मजुर माणसे नव्हेत.ज्याच्या रक्तावर,घामावर हा देश उभा राहिला आहे त्याला सारे विसरले.
टाळ्यांवरुन आणि पणतीवरुन एक जाणवले.आपण भारतीय यश मिळवण्या अगोदरच यशाचा उत्सव साजरा करतो.मोदीनी सांगितले टाळ्या वाजवा. आपण वाजवल्या.मोदींनी सांगितले प्रकाशझोत सोडा. आपण सोडले. जणुकाही आपण कोरोनावर मात केली असा जल्लोष झाला.जिंकण्याअगोदर जिंकल्याचे घोषित केले.त्यानंतर लोकांनी काढलेल्या मिरवणुका आठवुन पहा.सोशल डिस्टनसिंगची वाताहत झाली.मागे चंद्रावर यान उतरवण्याचे उदाहरण आठवा.हवा अशी तयार केली होती की जणु आपण माणुसच चंद्रावर उतरवला .रात्र रात्र जागुन काढली त्यासाठी.साधी तबकडीही आपण चंद्रावर उतरवु शकलो नाही.पण अपयशाची कबुली दिली तर ते भारतीय कसले?शास्त्रज्ञांना जाब विचारण्याऐवजी जागोजागी त्यांच्या गळ्यात हार घालण्याची चढाओढ लागली .अपयशामध्ये यश मानण्याची हास्यास्पद व्रुती आपल्यातुन जाईल कधी? यश मिळण्याअगोदर यश साजरे करण्याची आपल्याला घाई लागलेली असते.त्यातुन भयंकर चुका होतात.त्याचे परिणाम आपण भोगतो.लाँकडाऊन झाल्यानंतर एकही दिवस असा गेला नाही की सोशल डिस्टनसिंग
न पाळल्याची एकही घटना देशात कुठेही घडली नाही.वाढत्या कोरोनाची ती लक्षणे होती.
केन्द्र सरकार खरोखर कोरोनाच्या बाबतीत तेव्हढे गंभीर होते का हाही एक मुद्दा आहे.अन्यथा कोरोना सोडुन कोणत्याही विषयात त्यांनी राजकारण केले नसते.उद्धव ठाकरे यांच्या निवडणुकीचा विषय घ्या.अगदी हसे होईल ईतके हे प्रकरण ताणते ठेवले.ह्याला पोरखेळ म्हणतात.पालघर येथील साधुहत्येवरुन आणि वांन्द्रे स्टेशन समोरील मजुरांच्या गर्दीवरुन करण्यात आलेले राजकारण कोणाचीही मान शरमेने खाली घालायला लावेल.देवेन्द्र फडणविसांचे पितळ उघडे पडले.हा माणुस पाच वर्षे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता हे सांगायला देखील लाज वाटते.त्यांच्यापेक्षा आमचे शेखर धुरी अनेक पटीने हुषार आहेत.त्यात मुंबईहुन उद्योगधंदे गुजरातमध्ये पळवण्याचे कारस्थान देखील झाले.महाराष्ट्र आपल्या हातुन गेल्याबद्धल मोदींनी राजकारण करण्यास काहीही हरकत नाही.पण कोरोनाच्या काळात राजकारण करणे म्हणजे अति झाले.देशभरातील राजकारणाचा पाढा वाचला तर या काळात सामान्य लोकांच्या समस्येवर उपाय शोधण्यास मोदी सरकारकडे वेळ नव्हता हे सिद्ध होते.आता वीस लाख कोटी रुपयांचे पँकेज जाहीर झालेले आहे.असे आकडे फेकले म्हणजे देशाचे भले होत नाही.जगात कोठेही उपाशी लोकांचे तांडे त्यांच्या घरांकडे परतल्याचे कोरोनाच्या काळात उदाहरण नाही.भारताचे नाक शरमेने खाली गेले आहे.ते अशा पँकेजने ते वर येत नाही.
लाँकडाऊन फसल्याचे महिनाभरापूर्वी उघड झाले.तेव्हापासुन कोरोनाचा एक्सपोनेन्शियल कर्व्ह चालु झाला.लोकांच्या थांबलेल्या उत्पन्नावर कोणताही ईलाज मोदी सरकारकडे नव्हता.मग एकएक सुट देण्यात आली.दुकाने उघडायला,बाजारात जायला परवानग्या देण्यात येऊ लागल्या.शेवटी दारुची दुकाने देखील खोलली.पण प्रत्येक वेळेला शोशल डिस्टनसिंगचा बोजवारा उडाला.बोजवारा उडु नये म्हणुन सरकारकडे कोणताही उपाययोजना नव्हती.लोकांना गर्दी करण्याशिवाय पर्याय नव्हता.दारु खुली केल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले.आता खाजगी वाहानांना,सार्वजनिक वाहानांना आणि रेल्वेला प्रवासी वाहातुक करण्याची परवानगी दिली आहे.त्यामुळे सोशल डिस्टनसिंगचे तीन तेरा वाजले आहेत.लवकर कोरोना कधी नव्हे ईतके आक्रमक रुप आता धारण करील याबद्धल यत्किंचितही शंका नाही.
असेच जर होणार आहे तर मग लाँकडाऊन जाहीर करण्याची घाई तरी का केली?निदान दहा दिवसांची जरी मुभा दिली असती तर आजची आणिबाणीची परिस्थिती आली नसती.त्यावेळी कोरोनाचा प्रभाव तेव्हढा नव्हता.पण लोकही वाहत गेले.टाळ्या भांडी वाजवत राहिले.स्वतंत्र निर्णय घेण्याची शक्ती भारतीयांत कधी येणार कधी?लाँकडाऊन फसलेला आहे.त्यातुन काहीही निष्पन्न होणार नाही.लाँकडाऊन उठवल्याने रोजीरोटीचे प्रश्न तरी मार्गी लागतील.
याचा अर्थ बेफिकीर राहावे असे नाही.कोरोना येते वर्ष दोन वर्षे ठाण मांडुन राहाणार आहे.शोशल डिस्टनसिंगचे पालन कसोशीने केले पाहिजे.रेल्वे, सार्वजनिक आणि खाजगी वाहनांना नियंत्रित केले पाहिजे.डिझेल,पेट्रोलचे रेशनिंग झाले पाहिजे.पार्ट्या,मेळावे,धार्मिक, स्पर्धा,कौटुंबिक,सामाजिक आणि सार्वजनिक सोहळे पुर्णपणे बंद ठेवले पाहिजेत.विशेष म्हणजे मोदींचे वीस लाख कोटींचे पँकेज कधी आपल्या दारी येते याची वाट पहात राहिले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *