
◆ गृहमंत्री अमित शहांना एनयुजे आय व डिजेएने पत्र पाठविले!
◆ एनयुजे महाराष्ट्र नेही सन्मानपूर्वक सुटकेचे केले समर्थन!
नवी दिल्ली. आयपीसी कलम १२४ ए (देशद्रोह) आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम ५४अंतर्गत (चुकीच्या चेतावणीसाठी शिक्षा) गुजराती वृत्तपत्र फेस ऑफ नेशनचे संपादक आणि मालक धवल पटेल यांच्या अटकेचा निषेध करत नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स-इंडिया आणि दिल्ली जर्नालिस्ट असोसिएशन त्यांना तातडीने सोडण्याची मागणी केली
एनयुजे आय चे अध्यक्ष रास बिहारी आणि सरचिटणीस प्रसन्ना मोहंती, दिल्ली जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश थापलियाल आणि सरचिटणीस केपी मलिक यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, गुजरातच्या मुख्यमंत्र्याबद्दल बातम्या प्रसिद्ध केल्याबद्दल पत्रकाराच्या झालेल्या अटकेचा विरोध करतो आहोत.
गुजराती वृत्तपत्र फेस ऑफ नेशन्स आणि पोर्टलचे संपादक आणि मालक धवल पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानीबाबत एक बातमी प्रकाशित केल्याबद्दल आयपीसी कलम १२४ए (देशद्रोह) आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम ५४अंतर्गत
(चुकीच्या चेतावणीसाठी शिक्षा) नुसार अटक केले
आहे. धवल पटेल यांनी ७मे रोजी आपल्या वृत्तपत्रात असे लिहिले होते की , कोरोना साथीच्या साथीवर योग्य नियंत्रण न करता आल्याने भाजपा हाय कमांड मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना हटवून केंद्रीय मंत्री मनसुख भाई मंडावीया यांना.मुख्यमंत्री बनवू शकतात.
केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांना संघटनेने पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, असही असू शकतं की ही बातमी पूर्णपणे तथ्यावर आधारित नसली तरी एखाद्याला असे वाटेल की असेल की साथीचा प्रादुर्भाव थांबविण्यास मांडवीया अधिक चांगले काम करू शकतील. राजद्रोह व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत धवल पटेल यांना अटक करणे न्याय्य नाही. अशाप्रकारे पत्रकाराच्या अटकेबाबत माध्यम जगतामध्ये प्रचंड नाराजी आहे. गुजरातमधील पत्रकारदेखील या अटकेचा निषेध करत आहेत.
एनयुजे महाराष्ट्र च्या अध्यक्ष शीतल करदेकर यांनी हा अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा गळा घोटण्याचा प्रकार असून पटेल यांची सन्मानाने तत्काळ सुटका व्हावी असे म्हटले आहे.
धवल पटेल यांना तातडीने मुक्त करण्याची मागणी एनयूजीआय आणि डीजेएने केली आहे. यासह, त्यांनी पटेल यांचेवरील सर्व आरोप रद्द करण्याची मागणी केली आहे