

देशभरात कोरोना व्हायरसचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने मदतीचे आवाहन समाजातील घटकांना केले आहे. वसईच्या अतिरिक्त अधीक्षक विजयकांत सागर यांचे पुत्र चि. शौर्य विजयकांत सागर या बालकाचा 14 में या आजच्या सहाव्या वाढदिवसानिमित्त सागर कुटुंबीयांतर्फे कोविड साठी स्थापित मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधीला रु.14 हजार रकमेच्या मदतीचा धनादेश वसईच्या उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे याना शॉर्यच्या हस्ते सुपूर्त केला. कुटुंबियांनी हा वाढदिवस न करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचे ठरवले. दरवर्षी वाढदिवसाला येणारा खर्च यावर्षी शासनाला कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी खारीचा वाटा म्हणून मदत केली आहे. त्याच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.
