
पालघर जिल्ह्यातून फार मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव दर वर्षी वसई तालूक्यात मजूरी करीता स्थंलातरीत होत असतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही डहाणू, पालघर, बोईसर, तलासरी इत्यादी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव वसई तालूक्यात मजूरी करीता आले आहेत.
या प्रश्नांकडे आजवर कोणत्याही पक्षाने किंवा कुठल्याही आमदार खासदाराने ना कुठल्या नेत्याने लक्ष घातलेले नाही.
यावर लक्ष घातल ते फक्त आदिवासी एकजूट संघटनेचे
संघटनेचे अध्यक्ष शेरू वाघ, कार्यकर्ते निलेश दलवी व संघटनेच्या इतर कार्यकर्त्यांच्या मदतीने गावापाड्यात जाऊन लोकांची यादी तयार करून मा.तहसीलदार किरण सुरवनसे यांना निवेदन पोहचवले. त्यांच्या कडून सांगण्यात आले की यांना यांच्या गावी पोहोचण्यास मदत करु, आणि दोन दोन दिवस करून आज आठ दहा दिवस झाले आहे अजून पर्यत त्यांचा थांगपत्ता नाही आहे पंधरा वीस दिवसाने पावसाचे दिवस येतील त्यापूर्वी ह्यांना यांच्या गावी पोहोचवले पाहिजे जर शासनाने मदत नाही केली तर आदिवासी एकजूट संघटना लॉंग मार्च काढून त्यांना त्यांचे गावी पायी पोहोचवले जाईल, या लॉंग मार्च मध्ये आदिवासी मजुरांचे जीवाचे बरे वाईट अथवा अतिप्रसंग घडला त्याची जबाबदारी शासन राहील असे आदिवासी एकजूट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कु.शेरु वाघ यांनी सांगितले.