◆ मासळीच्या शोधात वसई-विरारकर!

वसई : ‘लॉकडाउन’चा काळ असह्य झालेले वसई-विरारकर सध्या मासळीच्या शोधात फिरताना दिसत आहेत. लॉकडाउन असल्याने मत्स्यप्रेमीच्या खाण्यावर बंधने आली होती.

लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ‘लॉकडाउन’चे नियम थोडे शिथिल झाल्याने वसई-विरार शहरात काही ठिकाणी मासळी विक्रेते बसताना दिसत आहेत. तर काही मासळी विक्रेत्या महिलांस काही तरुण नवकल्पना घेऊन लॉकडाउन काळात घरपोच मासळी देताना दिसत आहेत.

दरम्यान; जून महिन्यात मासेमारी बंदी होत बसल्याने वसई-विरारकरांचा मिळेल त्या किमतीत मासळी खाण्यावर भर आहे.

वसईतील पांचूबंदर इथे मासळीचे मोठे मार्केट आहे. याशिवाय या मार्केटबाहेरच असलेल्या सोसायटीसमोर अनेक मासळी विक्रेत्या महिला मासळी घेऊन बसतात. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासळीच्या शोधात फिरणाऱ्या खाद्यप्रेमीची गर्दी होताना दिसत आहे.

मासळी घेण्याच्या नादात या ठिकाणी झुंबड़ उड़त असल्याने सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत.

पांचूबंदर येथे सोसायटीसमोर भरणाऱ्या या मासळी बाजारामुळे मत्स्यप्रेमीची चंगळ होत असली तरी; येथे होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने
लॉकडाउनचे नियम पाळणाऱ्या नागरिकांनी गोची होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *