
वसई : वसई पश्चिम ओमनगर येथील एक महिला ताप येत होता म्हणून शुक्रवारी रिद्धी विनायक हॉस्पिटल नालासोपारा येथे ऍडमिट झाल्या रविवारी दुपारी त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली परंतु ती ज्या नगरात राहत होती तो विभाग कंटाईनमेंट झोन जाहीर करून तिथे औषध फवारणी करणे आवश्यक होते सोमवारी सकाळी ११.१५ वाजता महानगरपालिका प्रभाग समिती सहायक आयुक्त श्री घोंसळवीस यांना वरील प्रकार सांगितल्या नंतर त्यांनी तातडीने तो विभाग सील करून औषध फवारणी करण्यात आली.
सदर माहिती महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी यांनी संबंधित प्रभाग समितीला कळवणे आवश्यक असताना त्यांनी का नाही कळवली याबाबत उच्चस्तरीय चौकशी अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री आणि पालघर जिल्हाप्रमुख यांच्याकडे शिवसेना उपशहर मिलिंद चव्हाण यांनी केली आहे.