
राजाराम बाबर व शशीभूषण शर्मा यांची मागणी
प्रतिनिधी विरार : नवघर पूर्वेला राजवली गावाकडे जाण्यासाठी नविन रस्त्याचे काम पुर्ण झाले आहे. सदर रस्ता आठ फुट माती भराव करून रस्त्यावर डांबरीकरण पूर्ण झाले. जुलै 2018 रोजी अतिवृष्टी झाली होती. सोपारा खाडी आणि तुंगारेश्वर नदी या दोघांचे संगम राजीवली नविन पुलाकडे आहे. रस्त्याची उंची वाढली असल्या कारणाने नवघर माणिकपूर आणि दिवाणमान गाव सलग दोन ते तीन दिवस पाण्याखाली होते.
नविन रस्त्यावर बांधण्यात आलेला ब्रिज सार्वजनिक बांधकाम विभागाने दि. 11/02/2020 रोजी आपल्याकडे हस्तांतरण केला आहे. गेल्यावर्षी ह्या रस्त्याची उंची सहा फुटाची होती, परंतु आता अजून दोन फुट मातीभराव करून उंची वाढलेली आहे. सदरचा रस्ता हा वसई विरार शहर महानगरपालिकेने केला आहे का?
ह्या वर्षी पासून जोरदार पडला तर नवघर माणिकपूर दिवाणमान गाव कमीत कमी सहा फुट पाण्याखाली जाईल. कारण पाणी आठ फुट रस्त्याच्या भरावामुळे जाऊ शकणार नाही. महापालिकेने पुलाच्या बाजुला जे नऊ पाईप टाकले आहेत. त्यातून पाण्याचा निचारा जलद गतीने होणार नाही. त्यासाठी संपूर्ण रस्त्यावर किमान दोन कलव्हर्ट बनवले तर पावसाच्या पाण्याचा निचारा जलद गतीने होऊन संपूर्ण पाणी भाईंदर खाडीत जाईल व पुरपरिस्थिती निर्माण होणार नाही.
त्यामुळे राजवली दिवाणमान रस्त्याची प्रत्यक्ष पहाणी करून किमान दोन कलवट बांधण्यात यावा, अशी मागणी राजाराम बाबर आणि शशीभूषण शर्मा यांनी केली आहे. या बाबतचे पत्र त्यांनी पालघर जिल्हाधिकारी, वसई तहसीलदार आणि खासदार राजेंद्र गावित यांना दिले आहे.