*पालिकेचा एकही अधिकारी फोन उचलेना*

(प्रतिनिधी) वसई : केंद्र व राज्य सरकारने लॉकडाउन ४.० ची घोषणा केली असताना; वसई-विरार शहरात मात्र ठिकठिकाणी गर्दीचे चित्र असल्याने वसई-विरारमधील जनता संभ्रमात आहे. त्यामुळे ‘लॉकडाउन’साठी वसई-विरार शहर अपवाद ठरले आहे का? हे विचारण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी पालिका अधिकऱ्यांना फोन केले असता त्यांनी फोन उचललेले नाहीत. तर बहुतांश अधिकाऱ्यांचे फोन बंद येत असल्याच्या तक्रारी सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या आहेत.

वसई-विरार शहर रेड झोनमध्ये आहे. वसई-विरारमधील कोरोना रुग्णाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्या कमी व्हावी म्हणून महापालिकेकडून कोणतीही उपाय योजना होताना दिसत नाही. रविवारी विरार येथे काही ठिकाणी रुग्ण सापडल्यानंतर हा भाग सील केला नसल्याच्याही नागरिकांच्या तक्रारी होत्या. यावर संबंधित प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी बैरिकेडस उपलब्ध होत नसल्याचे कारण दिले होते.

दरम्यान, अशा भयाण स्थितीत वसई-विरार शहरातील अनेक ठिकाणी दुकाने उघड़ी असल्याचे चित्र होते. काही ठिकाणचे भाग तर गर्दीने ओसंडत असल्याने वसई-विरारमध्ये ‘लॉकडाउन’ आहे किंवा नाही, याबाबत नागरिक संभ्रमात आहेत.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत; मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे फोन उचललेले नाहीत. तर बहुतांश अधिकाऱ्यांचे फोन बंद आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *