
महाराष्ट्रामध्ये दररोज काम करणारे मजदूर बेरोजगार मोठ्या प्रमाणात राहत असून त्यांच्या हातावर त्यांचे पोट असतो अशा लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये याकरिता बहुजन महापार्टी तर्फे पक्षातील सर्व जिल्हाध्यक्ष यांना जेवण वाटप करण्याबाबत सूचना देण्यात आलेले आहे तसेच एस.के.बंगलो,सेंट थॉमस चर्च, एव्हरशाईन सिटी, वसई पूर्व या ठिकाणी आम्ही दररोज गरजू लोकांना जेवण वाटप करीत असतो असे बहुजन महा पार्टीचे महासचिव शमसुद्दीन खान यांनी सांगितले आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी एकही नागरिक उपाशी राहू नये याची दक्षता घेण्यात यावी याबाबत संबंधित अधिकारी यांना योग्य ती दक्षता घेण्याचे आदेश दिलेले आहेत.परंतू अद्याप प्रशासनामार्फत सर्व ठिकाणी मजदूर बेरोजगार गरजू लोकांसाठी जेवणाची व्यवस्था झालेली दिसून येत नसल्याने बहुजन महापार्टी तर्फे दररोज गरजू लोकांना जेवण वाटप करण्याचा प्रयत्न केला जात आहे.नरेंद्र मोदी सरकारने गरीब बेरोजगार लोकांच्या नावाखाली 20 लाख कोटीची आर्थिक मदत जाहीर केली आहे.सदरची रक्कम थेट जनतेला मिळायला हवी होती सदर रकमेतून गरीब बेरोजगार मजदूर लोकांना कुठलाही फायदा होणार नसून ही रक्कम अदानी, अंबानी,विजय माल्या,निरव मोदी,मेहुल चोक्सी यांच्यासारख्या मोठ्या लोकांना व कर्ज बुडवणाऱ्या लोकांना मिळणार आहे. केंद्र शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ महाराष्ट्रातील जनतेला लोकडाऊनच्या काळात मिळालेला नाही.अनेक ठिकाणी नागरिकांनी काही महिने राशन न घेतल्याने त्यांना दुकानदार राशन देत नाही दुकानदाराचे असे म्हणणे आहे की दोन तीन महिने राशन घेतले नाही तर त्यांची नावे पुरवठा यादीतून वगळली जातात अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या त्याअनुषंगाने आम्ही राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सर्व रेशनकार्ड धारक यांना रेशनिंग पुरवठा करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्व पुरवठा अधिकारी यांना रेशनिंग कार्ड असलेल्या व नसलेल्या सर्व लोकांना रेशनिंग द्यावे याबाबत योग्य ते आदेश सर्व पुरवठा अधिकारी यांना द्यावे व नागरिकांना जेवणाची सोय होईल याकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी केलेली आहे असे बहुजन महापार्टीचे महासचिव शमसुद्दीन खान यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.