पालघर दि 22 : राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आलेला असून कोव्हीड-19 चा जिल्ह्यातील प्रादुर्भाव पाहता आपल्या सर्वांच्या सुरक्षेतेसाठी रमजान ईद ” हा सण सर्वांनी आपल्या घरीच साजरा करावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी नागरिकांना केले.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढूनये या अनुषंगाने या कार्यालयाकडील दिनांक १७/०५/२०२० रोजीच्या आदेशानुसार पालघर जिल्हयात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे . या आदेशान्वये लोकांचा एकत्र समूह जमू न देण्यासाठी संपूर्ण जिल्हयामध्ये मनाई आहे. घेण्यात येणाऱ्या सभा , मेळावे , सामाजिक कार्यक्रम , जत्रा , यात्रा , दिंडया , पदयात्रा , ऊरुस , धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम , क्रिडा स्पर्धा इ . व जिल्हयातील सर्व पर्यटन व धार्मिक स्थळे लोकांकरिता बंद ठेवण्याकरिता मनाई करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
तसेच शासनाने दिनांक १ ९ / ०५ / २०२० रोजी सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या असून त्यामध्ये सर्व धार्मिक स्थळे तसेच इतर सर्व प्रार्थना स्थळे भाविकांना दर्शनासाठी बंद राहतील . सर्व धार्मिक सभा, परिषदा बंद राहतील असे निर्देश केले आहे . त्यानुसार जिल्हाधिकारी पालघर यांनी दिनांक २१/०५/२०२० रोजी आदेश निर्गमित केलेला आहे . या अनुषंगाने जिल्हयातील सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन करण्यात येते की , दिनांक २५/०५/२०२० रोजी साजरा करण्यात येणारा ” रमजान ईद ” हा सण सर्वांनी आपल्या घरीच साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *