वसई : पालघर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेला गडचिंचले येथील घटना ताजी असतानाच, आज वसईतील बालीवली येथील जागृत महादेव मंदिर व आश्रम येथील संत शंकरानंद सरस्वती व त्यांच्या सेवकावर काल रात्री अज्ञात समाजकंटकांकडून हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये गुरुजी व त्यांच्या सेवकाला मोठ्याप्रमाणात मारहाण करण्यात आली आहे व मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरी करून मंदिरात तोडफोड करण्यात आली. ज्यामध्ये मंदिराच्या अनेक वस्तूंची नासधूस करण्यात आली.
जागृत महादेव मंदिर व आश्रमचे संत शंकरानंद सरस्वती व त्यांचे सेवक यांच्यावर मध्यरात्री 12.30 च्या दरम्यान झोपेत असताना 4 समाजकंटकांकडून हा हल्ला करण्यात यावेळी संत शंकरानंद सरस्वती यांनी प्रसंगवधान राखत आपल्या आश्रमाच्या एका खोलीत जाऊन आतून कडी लावून स्वतःचा जीव वाचवला यावेळी त्यांच्या सेवकाने ही जिवाच्या आकांताने आश्रमातून पळून जात स्वतःचा जीव वाचवला.
याघटनेची माहिती भेटताच, भाजपा वसई रोड मंडळाचे अध्यक्ष उत्तम कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी, महाराष्ट्रात साधू-संत सुरक्षित नसल्याची खंत मांडली, काही दिवसांपूर्वीच पालघर जिल्ह्यात गडचिंचले येथे समाजकंटकांनी मिळून तीन साधू व एका सेवकाची निर्घृणपणे हत्या केली. त्याचा म्होरक्या ही आजून पकडण्यात आलेला नाही. अनेक आरोपी अजून ही फरार आहेत. हे सरकार साधू संतांना मारक असलेले सरकार आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री सपशेल अपयशी झालेले आहे. असे ते म्हणाले. याबाबतची संपूर्ण माहिती माहिती मी, राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते सन्माननिय देवेंद्रजी फडणवीस यांच्या कानावर घातली आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *