

पोलीसांकडून गतीमान कारवाई अपेक्षित…शीतल करदेकर
नालासोपारा : गोरेगाव येथील एका मुलीचे टिक टॉक वर बनावट अकाऊंट बनवून तिची बदनामी करणाऱ्या विकृतास नालासोपारा पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पूर्वी गोरेगाव येथे राहणाऱ्या १८ वर्षाच्या मुलीसोबत संजू नागनाथ पवार २२ याने मैत्री केली होती. त्यानंतर संजूचे इतर मुलींशी असलेले संबंध पिडीत मुलीने स्वतः पाहिल्या नंतर त्या मुलीची तिने समजूत घालून तिला संजूला सोडायला सांगितले मात्र तिने आपले संबंध कायम ठेवले. पिडीतेने दोघांनाही समजावल्या नंतर ऐकत नसल्याने तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. संजू हा पिडीतेला जीवघेणी मारहाण करत असे, संशय घेत असे. विकृत नराधमाच्या असल्या त्रासाला कंटाळून पिडीतेने त्याला सोडायचा निर्णय घेतला व माझ्यापासून लांब राहा असे सांगितले. पण संजू हा तिला सोडायला तयार नव्हता. त्याने तिला प्रेमसंबंध कायम ठेवण्यासाठी जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. आणि पिडीतेने त्याला सोडल्या नंतर त्याने तिला बदनाम करण्यासाठी टिक टॉक वर तिच्या नावाचे बनावट अकाऊंट तयार करून तिच्या छायाचित्राचे व्हिडिओ बनून त्यावर पिडीत मुलीचे अनेक मुलांशी संबंध असल्याचे बदनामीचा मजकूर लिहून पोस्ट केले होते.
या प्रकरणी नालासोपारा पोलीसांकडून विलंब होतहोता.त्रस्त झालेल्या मुलीने पत्रकार विजय देसाई यांना मदत मागितली.
एनयुजे महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांनी ही बाब तातडीनं मार्गी लागून मुलीला त्रासमुक्त करणे व इतर मुलीचीही फसवणूक होऊ नये म्हणून पोलिसांशी संपर्क केला.
आणि कामाला गती मिळाली.
या प्रकरणाची तत्कालीन पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख,अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर,पोलीस उपअधीक्षक अमोल मांडवे तपास अधिकारी रवी मातेरा यांनी टिकटॉक शी संपर्क साधून तो बदनामीकारक ते अकाऊंट डिलीट करून संजू नागनाथ पवार याला अटक करून पिडीत मुलीला न्याय मिळवून दिला आहे.पुढील तपास नालासोपारा पोलीस करीत आहेत,या गुन्ह्यासाठी कमीत कमी ३ वर्षाची शिक्षा आहे.
या कृत्याबद्दल पोलिसांचा पुरेसा प्रसादही या विकृतास मिळाला आहे.अशा कामी अधिक वेगाने पोलिसांनी काम केले तर अधिक चांगली वचक अशा विकृतांवर बसेल असे मत शीतल करदेकर यांनी व्यक्त केले. आणि पोलीसांनी केलेल्या या कामाबाबत आभार मानले आहेत
.