कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसई विरार शहर महानगरपालिकेचे नगरसेवक कायद्याचे उल्लंघन करून बळजबरीने परप्रांतीय नागरिकांकडून पैसे उकळण्याचे काम करीत असल्याचे स्पष्ट्पणे दिसून येत आहे. राज्य शासनाच्या मागणीनुसार केंद्र शासनाने परप्रांतीय लोकांना अन्य राज्यात जाण्यासाठी मोफत ट्रेन ची व्यवस्था केलेली असताना परप्रांतीय नागरिकांची आर्थिक फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक व त्याचे साथीदार करत असल्याने तहसीलदार वसई यांच्या आदेशानुसार संबंधित तलाठी यांनी तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन एफ आय आर क्र.०५३९/२०२० हा गुन्हा दाखल केला आहे तसेच ज्या नागरिकांकडून नगरसेवकांनी पैसे मागितले अशा नागरिकांनी सुद्धा तुळींज पोलीस ठाण्यात एफ आय आर क्र. ०५४४/२०२० हा गुन्हा दाखल केला आहे.अनेक परप्रांतीय नागरिकांनी प्रति व्यक्ती 1000/- रुपये प्रमाणे यांना पैसे देऊन गावी निघून गेले आहे. वसई विरार महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीची एक हाती सत्ता आहे. नालासोपारा विधानसभेत उत्तर भारतीय नागरिक मोठया प्रमाणात राहत असून ते सर्व मतदार आहेत.त्याच लोकांनी महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीला एकहाती सत्ता मिळवून दिली व यांना मतदान करून ३ आमदार निवडून दिले आता लोकडाऊनच्या काळात परप्रांतीय नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट असताना त्यांची आर्थिक फसवणूक करून त्यांच्याकडून ट्रेनच्या तिकिटाच्या नावाखाली बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक पैसे घेतात ही खुपच लाजीरवाणी बाब आहे.राज्य शासनाने वसई विरार शहर महानगरपालीकेतील सर्व नगरसेवकांचे कामकाज तहकूब करावे अथवा बरखास्त करावे अशी मागणी बहुजन महापार्टी तर्फे राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसई तालुक्यातून हजारो परप्रांतीय नागरिक उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तराखंड व इतर राज्यात मोठ्या प्रमाणात पलायन करीत आहेत.पलायन करण्यामागचे मुख्य कारण आहे की त्यांना येथील लोकप्रतिनिधी मार्फत ज्या सुविधा मिळायला हवी होती त्या सुविधा मिळालेले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव परप्रांतीय लोकांना व येथे मजदूरीचे काम करणाऱ्या लोकांना पलायन करावे लागत आहे.वसई विरार महानगरपालिकेत आमच्या बहुजन महापार्टीची सत्ता असती तर आम्ही शासनाच्या सर्व सोई सुविधा व वेळेवर जेवणाची व्यवस्था (होम डिलिव्हरी) येथील नागरिकांना करून दिली असती व परप्रांतीय नागरिकांचे पलायन होऊ दिले नसते.आज सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण वसई तालुक्यात वाढण्याचे मुख्य कारण आहे येथील नियोजन.महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक यांनी आपापल्या वॉर्ड मधील नागरिकांसाठी योग्य त्या सर्व सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या असत्या तर आज एवढे रुग्ण वाढले नसते.
आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी २० लाख कोटीची आर्थिक गरीब मजदूर लोकांसाठी तरतूद केल्याचे सांगतात परंतु अद्याप नागरिकांच्या खात्यात पैसे आलेले नाही.त्यामुळे १५ लाख रुपये नागरिकांच्या खात्यात येईल असे मोदींनी सांगितले होते व तो जुमला होता असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले त्याच प्रमाणे हा 20 लाख कोटी रुपये यापैकी गरिबांना काही एक रक्कम मिळणार नाही हा देखील एक जुमला आहे.
राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांचे सुरु असलेले मनमानी कारभार व भ्रष्टाचार संपवण्यासाठी एक मोठे पाऊल उचलण्याची गरज आहे असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना शमसुद्दीन खान यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *