मुक्तलेखन / कथालेखन स्पर्धेत मनोज बुंधे प्रथम

सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत अत्यावश्यक सेवा वगळता बरेचशे लोक घरीच आहेत.या मिळालेल्या वेळेचा चांगला उपयोग व्हावा यासाठी महादेव कोळी मित्र मंडळ मुंबई यांच्या वतीने “मुक्त लेखन” व “मुक्त कविता लेखन” स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यामध्ये १) आदिवासींची शिक्षणाची सद्यस्थिती आणि प्रश्न २) आदिवासींची सध्याची आर्थिक स्थिती आणि उपाय ३) आदिवासींमधील घुसखोरी आणि शासन व समाज ४) आदिवासींमध्ये असणारी बेरोजगारी आणि उपाय व प्रश्न अशा विविध विषयांवर २० मे या अंतिम तारखेपर्यंत लिखाण करावयाचे आवाहन केले होते.प्रत्येकी स्पर्धकाला एक कथा (जास्तीत जास्त ५०० शब्द) आणि दोन कविता पाठविता येणार होत्या.

दि १ जून रोजी सकाळी या लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये काव्य लेखन स्पर्धेत सीताराम कांबळे यांचा प्रथम,अंकुश तळपे यांचा द्वितीय तर मंदाताई वायळ यांचा तृतीय क्रमांक आला असून कथा लेखन स्पर्धेत “आदिवासींची सध्याची आर्थिक स्थिती आणि उपाय” ह्या विषयावर सुमारे ५०० शब्दांत लेखन करून मनोज बुंधे यांचा प्रथम क्रमांक आला आहे.विजयी झालेले निबंध आणि कविता महादेव कोळी मित्र मंडळ मुंबई यांच्या फेसबुक अकाऊंट वर प्रसिध्दी देण्यात येणार असून एक नियतकालिक प्रसिध्द करण्यात येणार आहे,त्यातदेखील या विषयी कविता आणि लेखाचा समावेश करण्यात येणार आहे.विजयी सर्व स्पर्धकांचे सर्व स्तरांतून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *