


**
पालघर दि.१ /6/2020 ;
मा.खासदार राजेंद्रजी गावित साहेब यांच्या अध्यक्षते खाली जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या वेळी जिल्ह्याचा संपूर्ण सुष्म आर्थिक विकास,आदिवासीजनजाती विभाग तसेच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी उपयोजना करण्या संबंधीत सखोल चर्चा झाली , जिल्ह्यातील साधनसामग्री वावरुन रोजगार उपलब्ध करावा त्या साठी शासनाच्या योजना गावातील प्रत्येक माणसा पर्यंत गेल्या पाहीजेत असे खासदार राजेंद्र गावित ह्यानी आधीकार्याना सांगीतले ,योजनाचा ईस्टांक वाढवावा अशा सुचना दिल्या तसेच आपल्या खात्याला अडचणी असल्यास मला सांगावे ,शासना कडे आपला खासदार म्हणून पाठपुरावा करुन अडचणी सोडवू असेही गावित म्हणाले ,तसेच जिल्ह्यातील नैसर्गिक साधन संपत्ती आणि त्यांचा शेतकऱ्यांना फायदा कसा करून देता येईल यावर चर्चा झाली.
सदर बैठकीत पालघरचे शिवसेना पालघर लोकसभा सहसमनव्यक केदार काळे जिल्हा उद्योग केंद्र निरीक्षक श्री.दत्तू पावडे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ श्री.अजित हिरवे,जिल्हा उपनिबंधक श्री.दिगंबर हौसारे,जिल्हा कृषी अधिकारी श्री.तरकसे,तालुका कृषी अधिकारी श्री.तरुण वैती,मंडळ कृषी अधिकारी श्री.प्रसाद गुंजवटे,जिल्हा परिषद कृषी अधिकारी श्री.सूरज जगताप,जिल्हा परीषद पालघर मुख्य लेखा व वित्त आधिकारी श्री.दिनेश थोरात उपस्थित होते.