
विरार – लॉकडाउन काळात कोणत्याही परिस्थितीत कामगारांना सेवेतून कपात न करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.परंतु या आदेशाला केराची टोपली दाखवत आयुक्त गंगाधरण डी. हे ‘हम बोले सो कायदा’ प्रमाणे कारभार हाकत आहे.वसई विरार मध्ये एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना पालिका आयुक्त मात्र कर्मचाऱ्यांची कपात करत सुटले आहेत.पालिकेच्या तिजोरीत ठणठणाट असल्याचे कारण पुढे करत
पालिकेच्या अतिक्रमण विभागातील १२७, आरोग्य विभागातील ८० आया,कक्ष परिचारिका व वार्ड बॉय तसेच ८ आरोग्य निरीक्षकांना तडकाफडकी सेवेतून कमी आहे.ऐन लॉकडाऊन काळातच आयुक्तांनी कामगार कापत केल्याने या कामगारांवर सध्या उपासमारीचे संकट उभे राहिले आहे.
एकीकडे आयुक्त दलनाच्या नूतनीकरणासाठी १५ लाख खर्च करीत तर दुसरीकडे आर्थिक पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक भार पडल्याचे कारण पुढे करत कामगार कापत करणाऱ्या आयुक्तांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून ५ जून पासून बेमुदत कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे.मनसे प्रणित महापालिका कामगार सेनेने
वसई विरार अध्यक्ष विजय मांडवकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे.
ऐन लॉकडाऊन काळात आयुक्तांनी तडकाफडकी निर्णय घेतल्याने सेवेतून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांवर बेकारी ओढवली आहे. त्यामुळे आयुक्तांच्या निर्णयाविरोधात कामगार संघटनानीही टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान मनसे प्रणित कामगार संघटनने याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे तक्रार केली होती.या कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी करत त्यांचा थकीत पगार देण्याची विनंती मनसेने केली होती. परंतु कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याबाबत तसेच त्यांच्या थकीत वेतनाचा कोणताही निर्णय न झाल्याने अखेर मनसेप्रणिते कामगार सेनेने बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयुक्तांच्या अशा प्रकारच्या चुकीच्या निर्णय व आदेशामुळे सेवेतून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय त्यांचे थकीत वेतनही देण्यात आलेले नाही. त्यामुळे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.या कर्मचाऱ्यांना पुन्हा कंत्राटी तत्त्वावर पालिका सेवेत रुजू करून घेण्याची मागणी केली आहे.दरम्यान आयुक्त गंगाथरन डी. यांनी कामगारांच्या विरोधात घेतलेले निर्णय व मनमानी कारभार विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेच्या नैतृत्वाखाली ५ जून पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा विजय मांडवकर यांनी दिला आहे. या आंदोलनात सर्व कामगारांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन उपाध्यक्ष मिलिंद साळवी यांनी केले असून आयुक्त गंगाथरन डी. यांची वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी सरचिटणीस चंद्रशेखर गुंजारी यांनी केली आहे.
नवनियुक्त आयुक्त गंगाथरन डी. यांनी वसई विरार मध्ये स्वतःचा मनमानी कारभार चालू केला आहे. आयुक्तांच्या या मनमानी कारभाराविरोधात आम्ही कामगारांना न्याय हक्कासाठी ५ जून पासून बेमुदत काम बंद पुकारत आहोत.महापालिका तिजोरीचा विचार करत कामगारांची कापत करणाऱ्या आयुक्तांनी स्वतःच्या दालनावर लाखो रुपये खर्च करणे हे कितपत योग्य आहे? तसेच विलगिकरण कक्षात असलेल्या व्यक्तींना जेवणाचे पैसे आकारणे हि लज्जास्पद बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत आयुक्त गंगाधरन डी.यांची तात्काळ चौकशी करून हकालपट्टी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कामावरून कमी केलेल्या अतिक्रमण विभागातील सर्व ठेका कर्मचारी व वैद्यकीय विभागातील ८० आया व कक्ष परिचारिका यांना पून्हा सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी तसेच त्यांचा थकीत पगार मिळावा यासाठी हे आमचे आंदोलन आहे.
-चंद्रशेखर गुंजारी (सरचिटणीस-मनसे महापालिका कामगार सेना)