

आज पहाटे फोन खणखणला आणि समोरून दुःखद व धीर गंभीर आवाज आला गणपत मोहिते (मामा) गेले.थोडा वेळ कळेनाच की आपण काय ऐकतोय ते विक्ष्वास बसला नाही म्हणून पुन्हा फोन केला पण बातमी अंतीमतहा सत्य होती.प्रचंड आठवणीचा व आठवत असलेल्या त्यांच्या व्यक्तीमत्वाचा जीवन पट समोर उलगडला आणि.मन सुन्न करणारी बातमी ऐकुन प्रचंड दुःख झाले.
वसई तालुक्यात विशेषतः पच्छिम सागरी पट्टा भागात 1980- 1990 च्या दशकात वसई पच्छिम भागात तेथील बौद्ध समाजाची अंत्यत बिकट व हलाकीची परस्थिती त्या वेळी होती.त्या वेळी शिक्षणाच विशेष महत्व समाजा पर्यत पोहचल नसाव.अशा परस्थितीत ऐक तेजस्वी, परंतु शांत,संयमी वेळ प्रसंगी सडेतोड व वाद झालेच तर समेट घडवणारा सुदृढ शरीरयष्टीचा ऐक तरून,तडफदार समाजीक कार्यासाठी तरून पुढे आले त्यांच नाव होत गणपत मोहिते.
स्वता खुप शिक्षण नसतांना व वेळ प्रसंगी रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणारे,घरची परस्थिती बेताची असतांनाही सामाजिक कार्याची ओढ लागलेला ऐक सच्चा कार्यकर्ता अशी ओळख हळू हळू समाजात होवू लागली.
तेथील स्थानिक राजकीय परिस्थिती लक्षात घेता स्थानिक पातळीवरील नेते व कार्यकर्ते यांचे त्यांचेशी सलोख्याचे व मैत्रीपुर्ण संबंध वाढले व त्या मैत्रीचा त्यांनी सामाजिक कार्यात समाजासाठी उपयोग करून घेतला तो आजतागायत. समाजात कोणताही सुख वा दुःखाचा प्रसंग असो गणपत मोहिते निस्वार्थ भावनेने पुढे असायचे.हे सर्व करत असतांना कुटुंब व नातेवाईक यांच्याशी प्रेमळ संबंध त्यानी निरंतर चालूच ठेवले.
ही बांधीलकी जपत असतांना त्याना मुबई येथे बीएसटी मध्ये नोकरी मिळाली तीही कष्टांची, परंतु हडाचा कार्यकर्ता असल्याने नोकरीतही ते थोड्या कालावधीतच लोक प्रिय झाले.त्यांची आर्थिक परस्थिती सुधारून आज ते प्रशस्त घरात वास्तव करीत होते.मागे वळून पाहताना त्यांनी गरीबीशी केलेले दोन हात व निस्वार्थ समाजसेवा केल्यानेच त्याच हे गोडफळ व वैभव आहे अस ते नेहमीच कृतज्ञता पूर्वक सांगत असत.
त्यांच्या अकाली जाण्यान मला त्याच भागातील त्याचेच मावसभाऊ जीवाचे संख्खे मित्र व माजी ग्रा.प.सदस्य
दिवंगत समाजसेवक मदन जाधव (मामा) यांची आठवण येते. याही व्यक्तिच जवळपास सामाजिक कार्य याच तोडीच ते गणपत मोहिते यांना वयाने व कार्यकर्ते म्हणून जेष्ठ होते.त्यांच सुद्धा काही वर्षांपूर्वी असच अचानक अकाली अंत झाला.
मी ज्यांच कार्य स्वता डोळ्यांनी पाहून प्रभावित झालो आहे असे मोजकेच कार्यकर्ते आहेत त्या पैकी हे दोन बंधू होय.
मला यांचे कार्य या साठी प्रभावित करते की तीस वर्षे पुर्वी कोणतीही विशेष शैक्षणिक पात्रता नसतांना ,आर्थिकस्थिती बेताची असतांना,ईतर समाजाच्या मानाने सामाजिक स्तर खाली असतांना,आता सारख सोशल नेटवर्किंग नसतांना,प्रभावीवक्ते वा संभाषण चातुर्य नसतांनाही ईतकी लोक प्रिय समाजसेवा हे करू शकतात यातच यांच वैशिष्ठ्य आहे.
गणपत मोहिते यांचा मृत्यु ज्या दिवशी झाला त्या पुर्व संधेला त्यांचा वाढदिवस होता.सामाजीक जाणीवा असलेली समस्त प्रेमळ व बुद्ध धम्माच्या मैत्री भावनेने प्रभावीत झालेले तेथील बंधू व भगिनींनी कृतज्ञतेच्या व सध्या ते काम करत होते त्या सेवेसाठी सध्याची कोरोना परस्थिती पहाता सर्व नियम पाळून त्याचा छोटेखानी सत्कार, शुभेच्छा, आशिर्वाद देण्याचा कार्यक्रम केला. अखेर या सत+कार्य =सत्कार्य चा आनंदाने
स्विकार करून गणपत मोहिते या समाजसेवकाचा अंत जनमानसाच्या सत्काराने व्हावा हा क्षण जरी पुण्यवंताचा असला तरी घटना अतिशय दुःखाचीच आहे.
गणपत मोहिते यांच्या अकाली जाण्यान समाजाची मोठी हाणी झाली आहे.त्याचे व्यक्तिमत्व व कार्य हे निरंतर स्मरणात राहील.