
यंदा पावसाळा लवकर सुरू होणार असून मुसळधार पाऊस आपल्या महाराष्ट्रात येणार असून त्याचा जोरदार तडाखा पच्छिम किनार पट्टीवरील गाव – शहरांना बसणार आहे. त्यातलाच एक भाग हा पालघर जिल्ह्यातील वसई किनारपट्टी सुद्धा आहे.. त्यातच वसई विरार शहर महानगरपालिका परिस्थीचा गंभीर विचार न करता नियोजन शून्य कारभार करीत असल्याचा प्रत्यय सागरशेत पेट्रोल पंप, वसई येथे दिसून आला. सागरशेत पेट्रोल पंप येथे ३१ मे २०२० रोजी गटाराचे दुरुस्तीचे काम महानगरपालिकेने सूचित केलेल्या ठेकेदार श्री. योगेश जोशी यांनी सुरू केले आहे.. सदर काम हे व वि श म पालिका प्रभाग समिती आय ने मंजूर केलेले आहे… परंतु महानगरपालिका, ठेकेदार व कंत्राटदार यांना ह्या लवकर पडणाऱ्या पावसाचा विसर पडला असावा अथवा त्यांना येणाऱ्या परिस्थितीचे गांभीर्य नसावे.. म्हणून त्यांनी हे गटार दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.. तसेच सदर काम सुरू करण्यापूर्वी महानगरपालिकेने, ठेकेदाराने आणि कंत्राटदाराने याबाबत आधी कोणतीही पूर्वकल्पना न देता रस्ता खोदण्यास सुरू केले होते… त्यामुळे हा मार्ग हा मुख्य रहदारीचा असल्यामूळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे.. अशावेळी ह्या कंत्राटदार यांस “काम सुरू करू नये, पावसाळा सुरू होईल” असे नागरिकांनी सांगितले असता “काही पावसाळा इतक्या लवकर सुरू होणार नाही, आम्ही १५ ते २० दिवसांत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू” असे सांगण्यात आले व नागरिकांना अरेरावी करत काम सुरू ठेवून रस्ता खोदण्यात आला.. व वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.. आणि आता पावसाळा सुरू झाला असून त्यानुसार सुरक्षतीचे घ्यावयाची काळजी व नियोजन कसे करावे याचे आदेश मा. जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत.. त्यानुसार सर्व कामकाज पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे.. त्यात हे रस्त्याचे काम सुद्धा अर्धवट अवस्थेत बंद करण्यात आले आहे.. आता सध्याची कोविड 19 रुग्णांची वाढती संख्या व परिस्थिती पाहता सागरशेत पेट्रोल पंप येथून हाकेच्या अंतरावर असलेले पारनाका येथील सर डि एम पेटिट सरकारी रुग्णालय व जी जी कॉलेज येथे रुग्णांची अथवा मृतकांची ने – आण करणारी रुग्णवाहिका किंवा युद्धजन्य परिस्थितीत अत्यावश्यक सुविधा पुरविणारी अग्निशमन दलाचे वाहन यांची अतिशय कोंडी होत आहे… वाहतुकीस आजूबाजूने जाण्याचा प्रयत्न केले असता अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.. आणि अशा वेळी जर एखादी दुर्घटना झाली तर त्यास जबाब कोण..?? महानगरपालिका, ठेकेदार की कंत्राटदार..?? असा सवाल येथील नागरिक करीत आहेत..